Union Budget 2021-22: सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाहीच; 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स रिटर्न भरण्यातून सूट
पण वयोवृद्धांना मात्र टॅक्स रिटर्न भरण्यामधून मुभा देण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ( 1 फेब्रुवारी) मोदी सरकार मधील तिसरं बजेट मांडलं आहे. कोरोना वायरस लॉकडाऊन पूर्वीपासूनच देशातील अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट होतं. त्यामध्ये लॉकडाऊन लागल्याने विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवण्याचं काम देशासमोर आहे. यामध्ये गोर गरीब आणि मध्यम वर्गीय यांचे कंबरड मोडून निघालं आहे. त्यामुळे सामान्यांना किमान इन्कम टॅक्स मधून सूट मिळेल अशी आशा असताना आजच्या बजेटमध्ये त्याची कोणतीच घोषणा झालेली नाही. पण वयोवृद्धांना मात्र टॅक्स रिटर्न भरण्यामधून मुभा देण्यात आली आहे. Budget 2021: मोदी सरकारची मोठी घोषणा, LIC चा आयपीओ 2022 मध्ये काढला जाणार.
आज निर्मला सीतारमण यांनी बजेट वाचताना दिलेल्या माहितीनुसार, 75 वर्षांवरील केवळ पेंशन हे उत्तन्न असणार्या नागरिकांना आता इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. त्यांना दरवर्षी टॅक्स रिटर्न भरण्यामधून मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पेंशन किंवा पेंशनवरील व्याजाची आता इन्कम टॅक्स रिटर्नमधून सूट झाली आहे.
सध्या नोकरवर्गातील लोकांना 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या कमाईवर 10 टक्के टॅक्स द्यावा लागतो. तर7.5 लाख ते 10 लाख रुपयांदरम्यान कमवणारे कर्मचारी 15 टक्के, 10 लाख ते 12.5 लाख रुपये असणारे 20 टक्के आणि 12.5 टक्के ते 15 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्ती 25 टक्के टॅक्स भरतात. हे स्लॅब असेच राहतील.
आज बजेट मध्ये फॉर्म 16 मध्ये देखील बदल करत त्याची प्रक्रिया सुकर करण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. तसेच ज्या नागरिकांचा कर थकला आहे अशांना पुन्हा रिटर्न भरण्यासाठी 6 वर्षे जुन्या आणि गंभीर प्रकरणांमध्ये 10 वर्षे जुने रेकॉर्ड्स दाखवावे लागत होते त्यामध्येही बदल झाले आहेत. आता ही कालमर्यादा 6 वर्षांवरुन 3 वर्षे करण्यात आली आहे. तर गंभीर प्रकरणांध्येही 10 वर्षे तेव्हाच ठेवली जाईल जेव्हा वर्षाला 50 लाखांपेक्षा अधिकची करचोरी झाली असेल.