IPL Auction 2025 Live

Unemployment Rate In India: देशात एक महिन्यात 15 लाख बेरोजगार; CMIE अहवालात खुलासा, ऑगस्ट महिन्यात बेकारीचा दर 8.32%

वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (Centre for Monitoring Indian Economy) ने नुकताच एक अहवाल जारी केला. या अहवालामध्ये सीएमआईई (CMIE ) म्हणते पाठिमागच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2021 मध्ये बेरोजगारीचा दर हा 8.32% इका राहिला आहे.

Unemployment Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (Centre for Monitoring Indian Economy) ने नुकताच एक अहवाल जारी केला. या अहवालामध्ये सीएमआईई (CMIE ) म्हणते पाठिमागच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2021 मध्ये बेरोजगारीचा दर हा 8.32% इका राहिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानसह कमीत कमी आठ राज्यांमध्ये बेरोजगारीच्या सरासरी दर हा दोन अंकांमध्य आहे. ऑगस्ट महिन्यात हरियाणा सर्वात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. हरियाणात ऑगस्ट महिन्यात बेरोजगारी दर 35.7% , राजस्थान 26.7%, झारखंड मध्ये ज्16%, बिहार आणि जम्मू कश्मीरमध्ये 13.6% इतका बेरोजगारी दर राहिला आहे.

सीएमआईई (CMIE) च्या अहवालानुसार जुलै 2021 च्या तुलनेत ऑगस्ट 2021 मध्ये जवळपास 15 लाख लोक बेरोजगार झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांच्या नोकरीच्या संधीच गायब झाल्या. जुलै महिन्यात 6.96% असलेला बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यात 8.32% वर पोहोचला.

CMIE च्या अहवालात म्हटले आहे की, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील बेरोजगारी जुलै महिन्यात 8.3% होती ती ऑगस्ट महिन्यात 9.78% वर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोना महामारीत गावाकडे परतलेला कामगार, नोकरदार स्थिती नियंत्रणात येताच पुन्हा शहराकडे परतताना दिसतो आहे. (हेही वाचा, Ministry of Defence Recruitment 2021: संरक्षण मंत्रालयात 400 पदांसाठी भरती प्रक्रीया; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख)

ऑगस्ट महिन्यात हरियाणा सर्वात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. हरियाणात ऑगस्ट महिन्यात बेरोजगारी दर 35.7% , राजस्थान 26.7%, झारखंड मध्ये ज्16%, बिहार आणि जम्मू कश्मीरमध्ये 13.6% इतका बेरोजगारी दर राहिला आहे. दिल्लीध्ये पाठीमागील महिन्यात दिल्लीमध्ये बेरोजगारी दर 11.6% वाढ नोंदवली गेली आहे.