Udyanraje Bhosale: साताऱ्याच्या लोकसभा जागेचा तिढा सुटला, भाजपाकडून उदयनराजे निवडणूकीच्या रिंगणात
साताऱ्यात सध्या शरदचंद्र पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसच उमेदवार देईल, असा आक्रमक पवित्रा अजित पवार यांनी घेतलेला होता.
सातारा आणि नाशिकच्या जागेवरील (Lok Sabha Election 2024) महायुतीतील तिढा अखेर सुटला असून साताऱ्यात उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) तर नाशिकमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभेच्या रिंगणात असतील. उदयनराजे भोसले यांनी पक्षनेतृत्वाच्या भेटीगाठीसाठी, उमेदवारी मिळविण्याकरिता राजधानी नवी दिल्लीत तीन दिवस उपस्थित होते. दुसरीकडे नाशिकच्या जागेवर शिंदे गट आणि भाजपमध्ये कमालीची स्पर्धा असताना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने बाजी मारून या जागेवरून छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी निश्चित दिल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा - Congress vs Shiv Sena-UBT: काँग्रेस नेत्याकडून शिवसेना (UBT) उमेदवाराचा 'खिचडी चोर' असा उल्लेख)
साताऱ्याच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार स्पर्धा होती तर इकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच, या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर महायुतीने निवडणूकपूर्व सर्वे पुढे करून दोन्ही जागांवर मार्ग काढले आहेत.
साताऱ्यात सध्या शरदचंद्र पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसच उमेदवार देईल, असा आक्रमक पवित्रा अजित पवार यांनी घेतलेला होता. राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्रित बसून यावर मार्ग काढला असून साताऱ्याची जागा भाजप लढवेल, त्याबदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभा मिळेल. तसेच येवल्याची निवडणूक यंत्रणा त्यांनी नाशिककडे हलवली होती. परंतु, यासंदर्भात होणाऱ्या चर्चांना भुजबळांनी थेट होकार, तसेच नकारही दिला नसल्याने सस्पेन्स वाढला होता.
(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2024 05:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

