UBS-Credit Suisse Merger: यूबीएस केर्डीट सुईस विलीनीकरणामुळे भारतालील हजारो नोकऱ्यांवर गंडांतर, वाचा सविस्तर

प्रामुख्याने यूबीएसच्या कारवाईचा सर्वाधिक झटका हा इंडिया बेस टेक्नॉलॉजी बॅक-ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसू शकतो, असे वृत्त 'द इकॉनॉमिक टाइम्स'ने दिले आहे.

UBS | File Image Used For Representational purpose Only |

आर्थिक संकटाचा सामना करणारी क्र्डिट्स सुईस यूबीएस (UBS) द्वारे ताब्यात घेण्यात ( UBS-Credit Suisse Merger) आल्यानंतर भारतातील हजारो नोकऱ्या धोक्यात आल्याची चर्चा आहे. प्रामुख्याने यूबीएसच्या कारवाईचा सर्वाधिक झटका हा इंडिया बेस टेक्नॉलॉजी बॅक-ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसू शकतो, असे वृत्त 'द इकॉनॉमिक टाइम्स'ने दिले आहे. जगतिक बँकांमध्ये होत असलेल्या उलतापालथी आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर स्विस नॅशनल बँकेने केलेली मध्यस्थी आणि घेतलेले निर्णय यांचा सर्वाधिक परिणाम इंडिया बेस टेक्नॉलॉजी बॅक-ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सुमारे 14,000 कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

आर्थिक क्षेत्रातील अभ्यासक सांगतात की, UBS ने क्रेडिट सुइस ताब्यात घेतले की, विद्यमान आणि संभाव्य आर्थिक जोखिमा टाळण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये नियमितता आणण्यासाठी तसेच परिस्थिती सुधारण्याच्या हेतूने खर्च, भूमिका आणि कृती यांवर निर्बंध लावते. ज्यामुळे बहु-शहर सुविधांवर परिणाम होतो. सहाजिक त्याचा परिणाम नोकऱख्यांवर होतो. (हेही वाचा, ESPN Layoffs: ईएसपीएन लवकरच करणार आहे मोठी टाळेबंदी, अनेक कर्मचारी होतील बेकार)

UBS आणि Credit Suisse चे प्रत्येकी अंदाजे 7,000 कर्मचारी तीन भारतीय शहरांमध्ये असलेल्या तंत्रज्ञान केंद्रांवर आहेत. जेव्हा UBS भूमिकांना तर्कसंगत बनवण्यास सुरुवात करेल, विशेषत: क्रेडिट सुइसमध्ये काम करणार्‍या यापैकी बर्‍याच नोकऱ्यांवर परिणाम होईल.