Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात दोघांनी संपवलं जीवन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच कुठल्याही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलून नाही, असं प्रशासन आणि मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) होणाऱ्या आत्महत्यांचे (Suicide) सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा मराठवाड्यात दोघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील 34 वर्षीय आणि लातूरमधील (Latur) 21 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. सचिन शिंदे आणि प्रदीप निवृत्ती मते असे आत्महत्या केलेल्या तरुणांची नावं आहेत. (हेही वाचा - CM Eknath Shinde On Maratha Reservation: 'मराठा आरक्षण' विषयावर विधिमंडळात 17 तास 17 मिनिटे चर्चा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर (Watch Video))
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लातूर जिल्ह्यातील बीएएमएसचे शिक्षण घेत असलेल्या प्रदीप मते या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. 'मराठा आरक्षण' अशी चिठ्ठी लिहून व मोबाईलवर स्टेटस ठेवत गळफास लावून या तरुणाने जीवन संपवलं. तर परभणीच्या सनपुरी गावात 34 वर्षीय सचिन शिंदे याने मराठा आरक्षणासाठी आपले जीवन संपवले आहे. 'मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी स्वतःला संपवत आहे', अशा आशयाची चिठ्ठी त्यांने लिहली आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच कुठल्याही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलून नाही, असं प्रशासन आणि मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही तरुण आत्महत्याकडे वळत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी लवकरात लवकर काही तोडगा काढण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.