Turkey Earthquake: Julie, Romio, Honey आणि Rambo चार जणांचं श्वानपथक भारतीय NDRF सह टर्कीत बचावकार्यासाठी दाखल

सोमवारी टर्की मध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर श्वान पथकाच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

Dog Squad | (Photo Credit ANI)

Turkey मधील विध्वंसक भूकंपाने मोठं जीवित आणि वित्तीय नुकसान झालं आहे. या संकटाच्या काळामध्ये आता अनेकांकडून टर्कीला मदतीचा हात पुढे आहे. भारतानेही आपली मदत पुढे केली आहे. 101 जणांच्या एनडीआरएफ पथकासोबत (NDRF Squad ) श्वान पथक (Dog Squad) देखील पाठवण्यात आले आहे. यामध्ये ज्युलि, रोमिओ, हनी आणि रॅम्बो यांचा समावेश आहे. लॅबरोडोर जातीचे हे कुत्रे प्रशिक्षित आहेत. त्यांची हुंगण्याची क्षमता आणि बचावकार्यामध्ये अन्य आवश्यक स्किलचे त्यांना प्रशिक्षण आहे. मंगळवारी 51 NDRF पथकाच्या पहिल्या तुकडीसोबत ते टर्की मध्ये रवाना झाले आहेत.

सोमवारी टर्की मध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर श्वान पथकाच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.  NDRF Director General Atul Karwal यांनी दिलेल्या माहितीनुसार, 101 जणांची टीम सर्व बाबतीत स्वयंपूर्ण आहे. सर्व आवश्यक अत्याधुनिक शोध आणि बचाव आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज आहेत.

NDRF team स्थानिक यंत्रणांना मदत करतील. त्यांच्या गरजेनुसार त्यांची मदत घेतली जाईल. special Indian Air Force flights ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार ही मदत देण्यात आली आहे. Commandant Gurminder Singh यांच्या नेतृत्त्वाखाली ही एनडीआरएफ टीम पाठवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत डॉक्टर्स, पॅरॅमेडिक्स आहेत.

Ministry of Home Affairs कडून टर्कीच्या या संकटकाळामध्ये भारताकडून सारी आवश्यक मदत पुरवली जाईल अशी माहिती दिली आहे. टर्कीच्या या भीषण भूकंपामध्ये 5000 जणांचा जीव गेला आहे.

भूकंपग्रस्त टर्कीला मदत करण्याचे काम NDRF टीमला सोपवण्यात आलेले हे चौथे आंतरराष्ट्रीय आपत्ती बचाव कार्य आहे. 6 फेब्रुवारी रोजी टर्की आणि सीरियामध्ये रिश्टर स्केलवर 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला, त्यानंतर भूकंपांच्या मालिकेमुळे दोन्ही देशांतील प्रचंड विनाश, जीवितहानी आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now