Tsunami Warning: पूर्व तिमोरमध्ये 6.01 रिश्टर स्केलचा भूकंप, हिंद महासागरात त्सुनामीचा इशारा

ज्याचे केंद्र लॉसपेलोस (Lospalos) नावाच्या ठिकाणापासून 38 किलोमीटर दूर उत्तर पूर्वेच्या दिशेला होते. अमेरिकी वैज्ञानिकांची संस्था USGS ने भूकंपाबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भूकंपामुळे लवकरच 'हिंद महासागरात त्सुनामी' येण्याची शक्यता आहे.

Representational Picture. Credits: Unsplash

दक्षिण-पर्व एशियाई देश पूर्व तिमोर (East Timor) मध्ये 60.2 रिस्टर स्केलचा भूकंप झाला आहे. ज्याचे केंद्र लॉसपेलोस (Lospalos) नावाच्या ठिकाणापासून 38 किलोमीटर दूर उत्तर पूर्वेच्या दिशेला होते. भूकंपाची तीव्रता 49 किलोमीटर व्यासात होती. या भूकंपामुळे सध्यातरी कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. परंतू, अमेरिकी वैज्ञानिकांची संस्था USGS ने भूकंपाबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भूकंपामुळे लवकरच 'हिंद महासागरात त्सुनामी' येण्याची शक्यता आहे.

USGS केवळ शक्यता वर्तवून थांबले नाही तर भारतीय समुद्रात त्सुनामी वॉर्निंग अँड मिटिगेशन सिस्टम (IOTWMS) नेसुद्धा भूंकपानंतर त्सुनामीचा इशारा दिला आहे. पूर्व तिमोरची राजधानीमध्येही एका पत्रकराने भूकंपचा अनुभव घेतला आणि म्हटले की हा खूप वेगाने आलेला भूकंप होता. आला आणि काहीच क्षणात गेलाही. लोक आपले काम आटोपून अगदी सामान्य रुपात बाहेर पडले. भूंकपामुळे शेजारील बोलिवियाची राजधानी ला पाजमध्ये आणि पेरुमध्ये काही शहरांमध्ये काही अपरिपक्व इमारती आणि भींतींना तडे गेले. (हेही वाचा, Indonesia मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्सुनामी, 62 जणांचा मृत्यू तर 600 हुन अधिक जखमी)

ट्विट

पूर्ण पृथ्वीवर अशी एकही जागा नाही. जिला रिंग ऑफ फायर म्हणतात (Ring of Fire). पूर्वी तिमोरची राजधानी यांतर्गत येते. म्हणजेच इथे भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखीय स्थिती सर्वाधिक होते. इथे याही आधी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात उत्तर सुमात्रा मध्ये आलेल्या 6.2 तीव्रतेच्या भूकंपात डझनभराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपामुळे ज्वलामुखी फुटतो किंवा पुन्हा एकदा ज्वालामुखी फुटल्याने भूकंप येतो. अनेकदा त्सुनामीही येते.

ट्विट

सन 2004 मध्ये सुमात्रा किनारपट्टीवर आलेल्या 9.01 तीव्रतेच्या भूकंपाने त्सुनामी आली होती. त्यात इंडोनेशियातील 1.70 लाख लोकांसह तिमोरचे सुमारे 2.20 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पूर्व तिमोर येथील लोकसंख्या सुमारे 13 लाख आहे.