Elephants Incident News: झारखंडमध्ये विद्युत धक्याने दोन पिलांसह पाच हत्तींचा मृत्यू
ज्यामध्ये या हत्तींचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना घाटशिला उपविभागाच्या जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या मुसाबनी येथील बेनियासाई गावात घडली.
झारखंड राज्यातील पूर्व सिंगभूम येथे दोन पिल्लांसह पाच हत्तींचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू (Elephants Incident) झाला. विद्यूत वाहीनिच्या उघड्या तारांच्या संपर्कात आल्याने ही घटना घडली. ज्यामध्ये या हत्तींचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना घाटशिला उपविभागाच्या जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या मुसाबनी येथील बेनियासाई गावात घडली. वन अधिकार्यांनी घटनास्थथील तातडीने धाव घेतली. ज्यामुळे आणखी चार हत्ती या दुर्दैवी घटनेची शिकार होण्यापासून वाचले. घटनास्थळापासून या हत्तींना दोर पळवण्यात वनविभागाला यश आल्याने संभाव्य धोका टळला.
वनविभागाच्या सतर्कतेमुळे चार हत्तींना जीवदान:
विभागीय वन अधिकारी ममता प्रियदर्शी यांनी सांगितले की, मुसाबनी येथील तांब्याच्या टाउनशिपमध्ये हत्तींचा थेट वायरशी संपर्क आल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचल्यावर उर्वरित चार हत्तींना धोक्याच्या क्षेत्रापासून दूर नेले. कळपातील उर्वरित हत्तींच्या सुरक्षिततेची खात्री केल्यानंतरच मृत हत्तींचे शवविच्छेदन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
वन विभाग सतर्क:
एसपी (ग्रामीण) ऋषभ गर्ग यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून परिसरात हत्तींचा कळप असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, पूर्व सिंघभूमचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी घटनास्थळी भेट दिली आणि वन अधिकाऱ्यांना घटनेचा सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या. भविष्यात अशा दु:खद घटना घडू नयेत यासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार वनक्षेत्रातील विद्युत तारा तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही त्यांनी वीज विभागाला देण्यात आले होते. दरम्यान, ही घटना घडली. पुढील हानी टाळण्यासाठी जवळच्या भागातील उर्वरित हत्तींना सुरक्षितपणे दूर हटवण्यावर वनविभागाने सध्या भर दिला असल्याचे भजंत्री म्हणाले
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सोमवारी रात्रीपासून सुमारे 12 हत्तींचा कळप जंगलात फिरत होता. तेथे विजेचा धक्का लागून 5 हत्तींचा मृत्यू झाला आहे. मृत हत्तींमध्ये तीन लहान हत्ती आणि दोन प्रौढ हत्तींचा समावेश आहे. घटना जंगलाजवळची आहे. हत्तींच्या मृत्यूची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मुसाबनी वनविभागाला माहिती दिली. वन विभागाचे रेंजर दिग्विजय सिंह, एचसीएल आयसीसीचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
दुसऱ्या बाजूला, हत्तींच्या कळपापासून वेगळे झालेले अनेक हत्ती परिसरात फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फॉरेस्ट ब्लॉक पंचायत आणि तेरंगा पंचायतमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हत्तींचे कळप फिरत होते, असे स्थानिक सांगतात. हत्तींनी आधी डझनभर शेतकऱ्यांच्या शेतातील भातपीक खाऊन टाकले आणि नंतर त्यांना पायदळी तुडवून नष्ट केले. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर हत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत होता.