Tractor Accident During Farmer's Rally: रॅलीदरम्यान स्टंट करताना ट्रॅक्टर उलटला, चिल्ला बॉर्डर येथील घटना; पाहा व्हिडिओ

त्यामळे नागरिकांना या रस्त्यांचा वापर करता येणार नाही. वापर केलाच तर पुढे मार्गक्रमण करता येणार नाही.

Tractor Accident | (Photo Credits: Instagram)

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावे यासठी दिल्लीच्या सीमेवर गेली 60 दिवस आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी आज (26 जानेवारी) ट्रॅक्टर रॅलीचे (Tractor Rally) आयोजन केले आहे. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात काही ठिकाणी संघर्षही झाला. सिगू आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलकांनी बॅरीकेट्स हटवून प्रवेश केला. यावरुन काही ठिकाणी अधिक संघर्ष पाहाला मिळाला. निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीत शांतता प्रस्तापीत करणे पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे. दरम्यान, रॅलीदरम्यान स्टंट करताना चिल्ला बॉर्डर (Chilla Border ) येथे एक ट्र्रॅक्टर पलटी झाला आहे. ट्रॅक्टर पलटी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना चिल्ला बॉर्डर येथे घडली. ट्रॅक्टरखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दोघेही मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरमध्ये बसलेले दोन व्यक्ती ट्रॅक्टर जागेवर फिरवत स्टंट करत होते. या वेळी चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर पलटी झाला. (हेही वाचा, Tractor Parade On Indian Republic Day 2021: दिल्ली-हरियाणा तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले; पोलिसांकडून शांततेचे अवाहन)

दरम्यान, नोएडा येथेही शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स मोठ्या प्रमाणावर तोडल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांनी काही ठिकाणी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचाही मारा केला आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वजीराबाद रोड, ISBT रोड, GT रोड, पुश्ता रोड, विकास मार्ग, NH-24, रोड नंबर 57 आणि नोएडा लिंक रोड सुद्धा बंद आहे. त्यामळे नागरिकांना या रस्त्यांचा वापर करता येणार नाही. वापर केलाच तर पुढे मार्गक्रमण करता येणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by NDTV India (@ndtvindia)

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ट्रॅफिक अलर्ट जारी करत म्हटले की, जीटीके रोड, आउटर रिंग रोड, बादली रोड, केएन काटजू मार्ग, मधुबन चौक, कंझावाला रोड, पल्ला रोड, नरेला आणि DSIDC नरेला रोड या ठिकाणीही रस्ते बंद आहेत. जर अत्यावश्यक सेवा अथवा कारण असेल तरच हे रस्ते वापरासाठी खुले आहेत.

दिल्लीच्या सिमेवर देशभरातील प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी गेले 2 महिने आंदोलन करत आहेत. आंदोलन आणि कृषी कायद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात 12 वेळा चर्चा झाली. परंतू, सर्वच्या सर्व चर्चेच्या फेऱ्या अयशस्वी झाल्या. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढण्याचा निर्णय घेतला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif