Pulwama Encounter: हिजबुल मुजाहिद्दीन कमाडंर Riyaz Naikoo पुलवामा येथे भारतीय लष्कराच्या सापळ्यात
33 व्या वर्षी त्याने दहशतवादी होत बंदूक हातात घेतली. मात्र, तोपर्यंत त्याची ओळख ही गणिताचा शिक्षक आणि गुलाबांची चित्रे काढण्याची आवड असलेला व्यक्ती अशी होती. सध्या त्याच्यावर 12 लाख रुपयांचे इनाम आहे.
जम्मू कश्मीर येथील मोस्ट वॉटेड दहशतवादी आणि हिजबुल मुजाहिदीन (Hizbul-Mujahideen) कमांडर रियाज नायकू (Riyaz Naikoo) याला भारतीय लष्कराने त्याच्या मूळ गावी सापळ्यात अडकवले आहे. जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) मधील पुलवामा जिल्ह्यातील बेगपोरा हे त्याचे मूळ गाव आहे. प्रमुख सूत्रांच्या आधारे आयएनएसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रियाज लपून बसलेल्या ठिकाणी अत्यापही शोधमोहीम सुरु आहे. लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. मात्र, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याबात पुष्टी केली नाही.
सुरक्षा दलांनी मंगळवारी सायंकाळी या मोहिमेला सुरुवात केली. जी बुधवारी रात्रभर चालले. अद्यापही ही मोहीम सुरु असल्याचे समजते. नायकू हा आपल्या मूळ गावी येणार असल्याची माहिती होती. त्यानुसार राष्ट्रीय राइफल्स (आरआर), केंद्रीय पोलीस बल (सीआरपीएफ) आणि स्थानिक पोलीस यांनी स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) मोहिम राबवली आणि सापळा रचला. गावातील सर्व सीमा तत्काळ बंद करण्यात आल्या आणि तपास सुरु करण्यात आला.
ट्विट
सूत्रांनी म्हटले आहे की, शेजारील गुलजारपोरा हे गावातही स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) मोहिम राबवताना सापळा लावण्यात आला आहे. या गावच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. 8 जुलै 2016 या दिवशी अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत पोस्टर बॉय आणि कमांडर बुऱ्हान वानी याला ठार मारण्यात आल्यानंतर हिजबुल मुजाहिदीनची सूत्रे कमांडर म्हणून नायकू याच्याकडे आली होती. (हेही वाचा, Jammu & Kashmir: अवंतीपोरा भागातील शार्शाली ख्रू येथे सुरक्षा दलाकडून एका दहशवाद्याला कंठस्नान; पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये चकमक सुरूच)
ट्विट
सांगितले जाते की, रियाज नायकू याने दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यापूर्वी स्थानिक शाळेत गणिताचा शिक्षक म्हणून काम केले होते. 33 व्या वर्षी त्याने दहशतवादी होत बंदूक हातात घेतली. मात्र, तोपर्यंत त्याची ओळख ही गणिताचा शिक्षक आणि गुलाबांची चित्रे काढण्याची आवड असलेला व्यक्ती अशी होती. सध्या त्याच्यावर 12 लाख रुपयांचे इनाम आहे.