Saket Gokhale Arrested: मोरबी पूल दुर्घटना ट्विट प्रकरणी TMC प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांकडून अटक

मोरबी पूल दुर्घटनेवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर केलेल्या पोस्टबद्दल गुजरात पोलिसांनी ही कारवाई (Saket Gokhale Arrested) केली.

Saket Gokhale | (Photo Credit - Facebook)

पश्चिम बंगारच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाचे नेते साकेत गोखले (Saket Gokhale) यांना गुजरात पोलिसांनी ( Gujarat Police) अटक केली आहे. मोरबी पूल दुर्घटनेवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर केलेल्या पोस्टबद्दल गुजरात पोलिसांनी ही कारवाई (Saket Gokhale Arrested) केली. या कारवाईमुळे गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेनंतर सुरु झालेला वाद अद्यापही कायम असल्याचे दिसून आले आहे. गुजरात पोलिसांच्या या कारवाईनंतर तृणमूल काँग्रेस पक्षाने दिलेल्या प्रतिक्रियेत भाजपकडून ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचे म्हटले आहे. गुजरात पोलिसांनी मोरबी पूल कोसळल्याबद्दल केलेल्या ट्विटवरूनच गोखले यांना अटक केल्याचा दावाही, तृणमूल काँग्रेसने केला आहे.

तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन ( MP Derek O'Brien) यांनी दावा केला आहे की, पक्षाचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी मोरबी पूल कोसळल्याप्रकरणी केलेल्या ट्विटवरून गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi Clicking Pics of Cheetah: पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनन कव्हर न काढता निकॉन कॅमेऱ्याने चित्त्यांची फोटोग्राफी? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य)

"टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. साकेतने सोमवारी रात्री 9 वाजता नवी दिल्लीहून जयपूरला जाणारे फ्लाइट घेतले. ते विमानतळावर उतरले तेव्हा गुजरात पोलिस राजस्थानच्या विमानतळावर त्यांची वाट पाहत होते. ते उतरचाच त्यांनी साकेतला ताब्यात घेतले," असे ओब्रायन यांनी ट्विटमध्ये म्हटले म्हणाले.

तृणमूल खासदाराने (डेरेक अब्रायन) पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ही एक प्रकारची “कुक अप केस” (cooked up case) आहे. मोरबी पूल कोसळल्याबद्दल साकेत गोखले यांच्या ट्विटवर अहमदाबाद सायबर सेलकडे केस दाखल करण्यात आली होती. केंद्रातील सत्ताधारी हे तृणमूल काँग्रेस आणि विरोधकांच्या प्रश्नांचे समाधान करु शकत नाहीत. त्यामळेच त्यांनी राजकीय प्रश्नांना सुडबुद्धीने वेगळ्या मार्गावर नेण्याचे ठरवले आहे.

ट्विट

गुजरातमधील मोरबी येथील झुलता पूल 30 ऑक्टोबर रोजी मच्छू नदीत कोसळला होता. अत्यांत निकृष्ट दर्जाची देखभाल आणि डागडुजी या पलिकडे पुलाच्या सुरक्षेची कोणतीच काळजी घेण्यात आली नव्हती. परिणामी पूल दुरघटना घडली. दुर्घटनेनंतर केलेल्या तपासणीत गंजलेल्या केबल्स, तुटलेल्या अँकर पिन आणि सैल बोल्ट यांसारख्या अनेक त्रुटी आढळून आल्या. देखभालीत या त्रुटींकडे लक्षच दिले गेले नसल्याने 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे चौकशीत पुढे आले होते.