वारीस पठाण यांचा शीरच्छेद केल्यास 11 लाखांचे इनाम देणार, हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या मुस्लीम संघटनेची घोषणा
हक-ए-हिंदुस्थान मोर्चा (Haq-e- Hindustan Morcha) या मुस्लीम संघटनेने वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा शीरच्छेद करा, ही कृती करणाऱ्याला आम्ही 11 लाखांचे इनाम देऊ अशी घोषणाच केली आहे.
एआयएमआयएमचे (AIMIM), राष्ट्रीय प्रवक्ते आणि भायखळा चे आमदार वारिस पठाण (Waris Pathan) यांनी गुलबर्गा (Gulberga) येथील सभेत केलेल्या भाषणात आम्ही 15 कोटी तुम्हा 100 कोटींवर भारी पडू असे विधान केले होते, मात्र हे विधान आता त्यांना चांगलेच गोत्यात आणणारे सिद्ध होत आहे, यापूर्वी AIMIM कडून पठाण यांना माध्यमांशी संवाद करण्यास बंदी घालण्यात आली आहेच त्यात भर म्ह्णून आता अनेक मुस्लिम संघटना सुद्धा त्यांच्या या विधानावर रोष व्यक्त करत आहेत. हक-ए-हिंदुस्थान मोर्चा (Haq-e- Hindustan Morcha) या मुस्लीम संघटनेने तर वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा शीरच्छेद करा, ही कृती करणाऱ्याला आम्ही 11 लाखांचे इनाम देऊ अशी घोषणाच केली आहे. इतकंच नव्हे तर मुजफ्फरपूर (Muzzafarpur), येथील कंपनी बाग रोडवरच्या हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारीस पठाण यांचा पुतळाही जाळला. वारीस पठाण देशद्रोही आहेत असं हक-ए-हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी म्हटलं आहे.
गुलबर्गा येथील सभेत बोलताना वारीस पठाण यांची जीभ घसरली, आणि आवेशाच्या भरात त्यांनी “100 कोटी हिंदू जनतेवर 15 कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिले जात नसेल तर ते आम्ही हिसकावून घेऊ असे म्हंटले होते.वारीस पठाण यांच्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले. पक्षातील कुरबुरीनंतर अखेर असदुद्दीन ओवेसी यांनी वारीस पठाण यांच्याविरोधात कारवाईचे पाऊल उचलत त्यांना पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत माध्यमंही संवाद करण्यास बंदी करण्यात आली आहे. वारिस पठाण यांचे '100 कोटी जणांवर आम्ही 15 कोटी महागात पडणार' असल्याचे वादग्रस्त विधान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका
पहा वारीस पठाण यांच्या भाषणाचा व्हिडीओ
दरम्यान वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करत मुस्लीम संघटनांनीही जोरदार टीका केली आहे. "तुम्ही ज्या 15 कोटी मुस्लिमांमध्ये आम्हाला घेऊ पाहात आहात ते आम्ही नाही" अशा शब्दात काही मुस्लीम बांधवांनी ठणकावून सांगितले आहे. वारीस पठाण यांच्या तोंडी देशद्रोह्यांची आणि पाकिस्तानाची भाषा आहे. ही बाब आम्ही कधीही सहन करणार नाही असंही या हक-ए-हिंदुस्थानच्या तमन्ना हाश्मी यांनी म्हटलं आहे.