Mother Allows Rape Of Daughters By 2 Lovers: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना साथीदारांना सहकार्य, महिलेला 40 वर्षांची शिक्षा

Sexual Abuse Against Teenage: केरळच्या विशेष जलदगती न्यायालयाने (Kerala special Fast Track Court) एका महिलेला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (POCSO) प्रकरणात 40 वर्षांची सश्रम कारावास आणि ₹ 20,000 च्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Representative Image

Sexual Abuse Against Teenage: केरळच्या विशेष जलदगती न्यायालयाने (Kerala special Fast Track Court) एका महिलेला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (POCSO) प्रकरणात 40 वर्षांची सश्रम कारावास आणि ₹ 20,000 च्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हा साधारण मार्च 2018 ते सप्टेंबर 2019 दरम्यान घडला. खटल्यात दोषी ठरलेली महिला मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या तिच्या पतीला सोडून शिशुपालन नावाच्या आरोपीसबत विवाहबाह्य संबंधामध्ये राहात होती. या वेळी शिशुपालन याने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर असंख्य वेळा अत्याचार केले या वेळी मुलीच्या गुप्तांगालाही मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या होत्या. धक्कादायक म्हणजे महिला एकाच वेळी दोन प्रियकरांसोबत विवाहवाह्य संबंध ठेऊन राहात होती.

धक्कादयक असे की, शिशुपालन हा गोष्टी करत असे तेव्हा त्यास महिला सहकार्य करत असे. मुलीची आई (दोषी महिला) आपल्या मुलीला शिशुपालन यांच्या घरी वारंवार घेऊन जात असे. या वेळी त्याने आईच्या उपस्थितच मुलीला अनेक वेळा मारहाणही केली होती. दरम्यान, एके दिवशी पीडिताची अकरा वर्षांची बहीण घरी आल्यावर मुलाने तिला अत्याचाराची माहिती दिली. मोठ्या मुलीवरही शिशुपालनने अत्याचार केले. त्याने धमकी दिल्याने मुलांनी माहिती उघड केली नव्हती. मात्र, मोठी बहीण मुलासह घरातून पळून आजीच्या घरी गेली. तिने घडला प्रकार आजीला सांगितला. त्यानंतर आजीने हा प्रकार पोलिसांना सांगितला आणि मुलांना बालसुधारगृहात हलवले.

दरम्यान, बालसुधारगृहात झालेल्या समुपदेशनादरम्यान मुलांनी हा प्रकार उघडकीस आणला. आरएस विजय मोहन, विशेष सरकारी वकील एएनआयला यांनी सांगितले की, "या गुन्ह्यासाठी आईला 40 वर्षांची शिक्षा आणि ₹ 20 हजार दंड ठोठावण्यात आला आहे. हा गुन्हा आरोपीच्या मुलीच्या दोन अपत्यांवर अत्याचार केल्याबद्दलचा आहे. आहे. त्यांच्यावर आरोपीच्या प्रियकराने लैंगिक आणि क्रूरपणे अत्याचार केले गेले आहेत. आरोपीचा मूळ पती मानसिक रुग्ण आहे. त्यामुळेच ती मुलांसह घर सोडून दोन प्रियकरांसोबत राहात होती." (हेही वाचा, Titwala Rape Case: टिटवाळा रेल्वे स्थानकात महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत)

पहिला प्रियकर, शिसुपालनने मुलगी जेव्हा सात वर्षांची होती आणि इयत्ता पहिलीत शिकत होती तेव्हा तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केले. त्यावेळी पीडितेने संपूर्ण घटना आरोपीला सांगितली पण तिने काहीही केले नाही आणि तिने पीडितेवर अत्याचार करण्यास दुसऱ्या प्रियकराला मदत केली. न्यायाधीश आर रेखा यांना आढळले की आरोपीची कृती ही संपूर्ण मातृत्वासाठी लाजिरवाणी आहे आणि ती माफीची पात्र नाही. त्यामुळे तिला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली,” असेही कोर्टाने पुढे म्हटले.

खटल्यादरम्यान पहिला आरोपी शिशुपालन याने आत्महत्या केली. त्यामुळे आईविरुद्धच खटला चालवण्यात आला. ही मुले सध्या बालगृहात राहत आहेत. या खटल्यात बावीस साक्षीदार तपासण्यात आले व तेहतीस कागदपत्रे सादर करण्यात आली.