Taj Mahal: पर्यटकांना 21 ऑगस्टपासून चांदण्या रात्रीत पाहता येणार ताजमहल, 'अशी' करा तिकिटांची बुकींग
मात्र, देशात कोरोनाची परिस्थिती सुधारत असून अनेक निर्बंध शिथिल केले जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील धार्मिक, सास्कृतिक आणि पर्यटन बंद किंवा निर्बंधाखाली सुरु करण्यात आले आहे. मात्र, देशात कोरोनाची परिस्थिती सुधारत असून अनेक निर्बंध शिथिल केले जात आहे. याचपार्श्वभूमीवर मूर्तिमंत प्रेमाचे प्रतीक आणि जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला ताजमहाल (Taj Mahal) 17 मार्च 2020 पासून पर्यटकांसाठी रात्रीचा बंद करण्यात आला होता. मात्र, आता येत्या 21 ऑगस्टपासून ताजमहल पर्यटकांसाठी रात्रीचा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रवेश करता येणार आहे. दरम्यान, या काळात कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी बसंत कुमार यांनी सांगितले की, पर्यटक रात्री केवळ दीड तास उघडे ठेवण्यात येणार आहे. रात्रीच्या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आग्रामध्ये रात्री 10 वाजल्यापासून रात्रीचा कर्फ्यू सुरू होतो. अशा परिस्थितीत पर्यटक रात्री 8:30 ते रात्री 10:00 पर्यंत ताजमहालमध्ये प्रवेश करू शकतील. हे देखील वाचा- Ganpati Utsav 2021: पीओपीच्या गणेशमुर्ती खरेदी करणाऱ्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा- गोवा मंत्री निलेश कॅबरल
तिकिट बुकिंग प्रक्रिया-
ताजमहलच्या दर्शन घेण्यासाठी 3 स्लॉट बनवण्यात आले आहेत. पहिला स्लॉट 8.30 ते 9, दुसरा 9.30 ते 9.30 आणि तिसरा 9.30 ते 10 पर्यंत असेल. ताजमहालच्या रात्रीच्या दृश्यासाठी तिकीट व्यवस्था पूर्वीप्रमाणेच ऑनलाइन असेल. पर्यटक एक दिवस अगोदरच तिकीट बुक करू शकतात. आपण अधिकृत वेबसाइट www.asi.payumoney.com आणि www.asiagracircle.in वर ताजमहालची तिकिटे खरेदी करू शकता. भारतीय आणि विदेशी पर्यटकांसाठी ई-तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध आहे.
या महिन्यात 21, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी पर्यटक चांदण्या रात्री ताजमहाल पाहू शकतील. लॉकडाऊनमुळे ताजमहाल 22 ऑगस्ट रोजी बंद राहील. यानंतर, पर्यटक सोमवार आणि मंगळवारी ताजमहाल पाहू शकतात. एएसआयने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. जर तुम्ही देखील ताजमहाल बघायला जात असाल तर आवारात कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.