Delhi Rau's IAS Centre Flooding: राव IAS कोचिंग अपघातास कारणीभूत ठरलेली SUV जप्त, दिल्ली पोलिसांकडून वाहन मालकालाही अटक
ओल्ड राजेंद्र नगर दुर्घटनेबाबत दिल्ली पोलीस दिल्ली महानगरपालिकेला नोटीसही बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राव IAS कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याने 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ओल्ड राजेंद्र नगर कोचिंग सेंटरच्या गेटला धडकणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून SUV चालकालाही अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत एकूण सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ओल्ड राजेंद्र नगर दुर्घटनेबाबत दिल्ली पोलीस (Delhi Police) दिल्ली महानगरपालिकेला (MCD) नोटीसही बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस एमसीडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावू शकतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्लीच्या आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक; विना परवानगी तळघरात सुरू होती लायब्ररी!)
पाहा पोस्ट -
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी बीएनएस कलम 105, 106(1), 152, 290 आणि 35 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. कोचिंग सेंटरचे व्यवस्थापन आणि नागरी संस्थेच्या लोकांची चौकशी सुरू आहे. एमसीडीचे पर्यवेक्षक ऋषीपाल म्हणाले की, काम जवळपास पूर्ण झाले आहे. फक्त 3-4 इंच पाणी शिल्लक आहे. एमसीडीने सर्व मशीन्स बसवल्या आहेत. तळघरासह इमारत पूर्णपणे रिकामी आहे. याठिकाणी कोणीही फसलेले नाही. या दुर्घटनेनंतर दिल्लीच्या महापौरांनी इमारतीच्या नियमांचे उल्लंघन करून तळघरात सुरू असलेल्या कोचिंग सेंटर्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.