जम्मू काश्मीर: पुलवामा येथील अरिहल येथे IED हल्ला; 9 जवान जखमी
जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करुन आयईडीचा स्फोट घडवण्यात आला.
जम्मू काश्मीर (Jammu And Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) येथे लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करुन आयईडीचा स्फोट (IED Blast) घडवण्यात आला. लष्कराच्या 44 राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनाला लक्ष्य करुन हा स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात 9 जवान जखमी झाले. त्यातील 3 जवानांची प्रकृती गंभीर असून सर्व जवानांवर उपचार सुरु आहेत.
पुलवामा मधील अरिहर गावातील अरिहल-लस्सीपुरा रस्त्यावर लष्कराचे चिलखती वाहन जात असताना हा आयईडी स्फोट घडवण्यात आला.
ANI ट्विट:
दहशतवाद्यांकडून आयईडी हल्ला घडवण्यात येईल अशी माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली असून त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली.