Telangana Boy Throat Case: खेळताना गिळलेला प्लास्टिकचा कण अखेर बाहेर काढला; खम्मममधील 6 वर्षीय मुलाच्या त्रासाला अखेर विराम
तेलंगणामधील खम्मम येथे, डॉक्टरांनी एका ६ वर्षीय मुलाच्या घशातून प्लास्टिकची गोळी काढली, वर्षभर वेदनेने झुंजल्यानंतर. खेळण्यातील बंदुकीने गिळलेली परदेशी वस्तू एंडोस्कोपीद्वारे काढली गेली.
तेलंगणातील खम्मम (Khammam Boy Plastic Pellet) येथील एका 6 वर्षीय मुलाला गेल्या एक वर्षापासून घशात प्रचंड वेदना (Pain Case) होत होत्या. पालकांनी विविध डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार, सल्ला घेऊनही त्यास आराम मिळत नव्हता. अखेर तेलंगणातीलच एका डॉक्टरला त्याच्या त्रासाचे कारण सापडले. एका वैद्यकीय तपासणीत आढळून आले की, त्याच्या गळ्यात प्लॅस्टीकचा तुकडा अडकला होता. धक्कादायक म्हणजे त्याच्या गळ्यात अडकलेला प्लॅस्टीकचा तुकडा पाठिमागील अनेक वर्षांपासून तसाच त्याच्या घशात अडकला होता. एका शस्त्रक्रियेमुळे तो तुकडा काढण्यात डॉक्टरांना यश आले. ज्यामुळे या चिमुकल्यास आराम मिळाला आहे.
तेलंगणातील खम्मम येथील पीडित मुलाचे नाव शन्मुखा असे आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी खेळताना त्याने टॉय गनमधील प्लास्टिकचा छोटा कण अनाहकाने गिळला होता. त्यानंतर त्याच्या घशात कायमस्वरूपी वेदना जाणवत होत्या. एकापाठोपाठ एक अनेक डॉक्टरांना दाखवल्यानंतरही समाधानकारक निदान झाले नाही. अखेर त्याच्या पालकांनी खासगी रुग्णालयातील ईएनटी (ENT) तज्ज्ञ डॉ. प्रविण कुमार यांच्याशी संपर्क साधला. तपासणीदरम्यान डॉ. कुमार यांना मुलाच्या घशात परकीय वस्तू अडकल्याचा संशय आला. त्यांनी लगेच एन्डोस्कोपी (endoscopy) करण्याचा निर्णय घेतला आणि ती करून शन्मुखाच्या घशात अडकलेला प्लास्टिकचा कण यशस्वीरित्या बाहेर काढला. (हेही वाचा, Chicken Gets Stuck in Throat: बिर्याणी खाताना चिकनचा तुकडा घशात अडकला; एकाचा मृत्यू)
डॉ. कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी ओएसोफॅगस मार्गे (esophagus) एंडोस्कोपचा वापर करून ही शस्त्रक्रिया केली आणि कण सुरक्षितपणे काढून टाकला. सध्या मुलगा ठणठणीत बरा होत असून, त्याचे पालक डॉक्टर आणि वैद्यकीय टीमचे आभार मानत आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाचा दीर्घकाळ चाललेला त्रास संपल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हा प्रकार लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा इशारा ठरतो. खेळण्यांमधील छोटे अवयव अपघाताने गिळले जाण्याचा धोका राहतो, त्यामुळे पालकांनी याबाबत अधिक सतर्क राहावे, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

