Tejashwi Yadav (फोटो सौजन्य - फेसबुक)

Tejashwi Yadav Narrowly Escapes Accident: बिहारमधील मधेपुरा येथे रात्री उशिरा तेजस्वी यादव यांच्या ताफ्याला अपघात झाला. या अपघातात तेजस्वी यादव थोडक्यात बचावले. या घटनेत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, तेजस्वी यादव मधेपुराहून पाटणा येथे परतत होते. ते राष्ट्रीय महामार्ग 22 वर चहा पिण्यासाठी थांबले होते. तेजस्वी यादव, पक्षाचे प्रवक्ते शक्ती यादव आणि इतर काही नेते नुकतेच गाडीतून खाली उतरले होते. तेव्‍हा एका वेगवान ट्रकने त्यांच्या ताफ्याला धडक दिली.

या अपघातात सुरक्षा वर्तुळात चालणारे अनेक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. तेजस्वी यादव त्यांना हाजीपूर रुग्णालयात घेऊन गेले. या अपघाताबद्दल माहिती देताना तेजस्वी यादव यांनी सांगितले की, ते कार्यक्रमानंतर मधेपुराहून परतत होते. ते चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यानंतर एका वेगवान अनियंत्रित ट्रकने माझ्या समोरच ताफ्याच्या 2-3 गाड्यांना धडक दिली. यात अनेक सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले. हा अपघात माझ्यापासून फक्त 5 फूट अंतरावर घडला. जर ट्रक थोडा अनियंत्रित असता तर तो आम्हाला चिरडून गेला असता.

तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ट्रकने दिली ताफ्याला धडक - 

दरम्यान, लोकांनी टोल नाक्यासमोर ट्रक चालकाला पकडले. तथापि, पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.