'50 कोटी रुपये दिल्यास पंतप्रधान मोदी यांना मारण्यास तयार', वादग्रस्त व्हायरल व्हिडिओवर तेज बहादुर यांची प्रतिक्रिया 'व्हिडिओतील शब्द माझे नाहीत'
मात्र, काही तांत्रिक कारणामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली होती. बीएसएफमध्ये मिळत असलेल्या कथीत निकृष्ट दर्जाच्या भोजनाबद्दल तेज बहादुर यांनी केलेल्या तक्रारीचा एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून तेज बहादुर हे चर्चेत आले आहेत.
Tej Bahadur Yadav Viral Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या विरुद्ध वाराणसी (Varanasi) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे बीएसएफ बडतर्फ जवान तेज बहादुर यादव (Tej Bahadur Yadav) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते 'आपल्याला जर 50 कोटी रुपये मिळाले तर, मी पंतप्रधान मोदींना मारण्यास तयार आहे', असे सांगताना दिसतात. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून व्हायरल झाल्यानंतर तेज बहादुर यादव यांनी या व्हिडिओबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रियेदाखल बोलताना 'हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. तसेच, या व्हिडिओत आपण दिसतो आहोत. मात्र, त्यातील शब्द हे आपले नाहीत', असे तेज बहादुर यांनी म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तेज बहादुर यांना विचारतो की, आपण मोदींना मारणार बहुदा. यावर तेज बहादूर म्हणतात की, जर मला 50 कोटी रुपये मिळाले तर, मी मोदींना मारु शकतो. यावर समोरचा व्यक्ती म्हणतो की, आपल्याला भारतात कोणी देणार नाही. यावर उत्तरादाखल तेज बहादुर सांगतात की, 'मग मी देशासोबत गद्दारी करु शकत नाही. ' दरम्यान, या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना तेज बहादुर सांगतात की, 'हा व्हिडिओ माझा आहे. मात्र, या व्हिडिओतील शब्द माझे नाहीत.' तसेच, हा व्हिडिओ 2017 या वर्षातील मे किंवा जून महिन्यातील आहे.
दरम्यान, पुढे बोलताना तेज बहादुर सांगतात की, त्या वेळी निवडणूक लढवावी असा कोणताच हेतू माझ्या मनात नव्हता. भाजपवर आरोप करत ते म्हणतात, नोकरीतून बडतर्फ झाल्यावर दिल्लीत आंदोलन करताना अनेक लोक मला भेटले. हा व्हिडिओ बनविणाऱ्यांबद्दल मला हे माहित नव्हते की, त्यांच्या मनात काय चालले आहे. आता मला थांबविण्यासाठी माझ्याविरुद्ध काय काय काढतील हेही मला समजू शकत नाही.
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप प्रवक्ता जीव्हीएल नरसिंह राव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात विरोधकांची हिंसात्मक योजना पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो. (हेही वाचा, जेवणाच्या दर्जाबद्दल टीका करणाऱ्या निलंबित BSF जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू)
हाच तो व्हायरल व्हिडिओ
तेज बहादुर हे समाजवादी पार्टीकडून वाराणसी येथून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवत होते. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली होती. बीएसएफमध्ये मिळत असलेल्या कथीत निकृष्ट दर्जाच्या भोजनाबद्दल तेज बहादुर यांनी केलेल्या तक्रारीचा एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून तेज बहादुर हे चर्चेत आले आहेत.