बहिण भावाच्या प्रेमसंबंधाना घरच्यांचा नकार, विवाहास विरोध झाल्याने दाघांचीही आत्महत्या; सुसाईड नोट पाहून पोलिसही चक्रावले

तो इथे अभियांत्रिकी शिक्षण घेत होता. पोलिसांनी सांगितले की, या दोघांनीही गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घरातून पळून जाण्याचा विचार केला होता. मात्र, पळून जाण्याच्या विचारात असताना घरच्यांनी त्यांना पकडले

Suicide | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

एका अल्पवयीन मुलीला आपल्या 21 वर्षीय चुलतभावासोबत लग्न करायचे होते. ती त्याच्यावर प्रेम करत होती. महत्त्वाचे म्हणजे त्याचेही तिच्यावर प्रेम होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. त्यातून दोघांनी लग्न करायचे ठरवले. कुटुंबीयांना या प्रेमसंबंधांची माहिती मिळताच त्यांनी दोघांनाही विरोध केला. प्रेमास होणाऱ्या विरोधाला कंटाळून दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना दिल्ली (Delhi) येथे सोमवारी (23 डिसेंबर) पुढे आली. या प्रकाराबद्दल प्रसमारमाध्यमांना माहिती देताना डीसीपी (DCP) गौरव शर्मा (Outer North) District) यांनी सांगितले की, एका व्यक्तीने पोलिसांना फोनवर सांगितले की, दोघांनीही आत्महत्या केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, दोघांनीही आत्महत्या केल्याचे पुढे आले. पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोट (Suicide Note) ही मिळाली. सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, आम्ही उदास आणि पीडित आहोत. घरातील लोक आमचे ऐकायलाच तयार नाहीत. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचे आहे. परंतू, घरचे ऐकत नाहीत. त्यांचा या लग्नाला विरोध आहे. ते लोक कुटुंब आणि आपल्या इज्जतीची पर्वा करतात पण आम्ही आमची परवा करतो. म्हणूनच आम्ही हे पाऊल उचलत आहोत.

पोलिसांनी सांगितले की, 'घटनास्थळी एकाचा मृतदेह पंख्याला लटकत होता. तर, दुसऱ्याचा मृतदेह घराच्या छताला असलेल्या हुकाला लटकत होता. सुसाईड नोटवर मजकूर आणि त्याखाली दोघांचीही सही आहे. '

घटनेबद्दल अधिक तपशील देताना पोलिसांनी म्हटले आहे की, मृत युवक राजस्थान येथील कोटा येथील राहणारा आहे. तो इथे अभियांत्रिकी शिक्षण घेत होता. पोलिसांनी सांगितले की, या दोघांनीही गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घरातून पळून जाण्याचा विचार केला होता. मात्र, पळून जाण्याच्या विचारात असताना घरच्यांनी त्यांना पकडले. (हेही वाचा, मालेगाव: विवाहित महिलेसोबत अविवाहित तरुणाची आत्महत्या; प्रेमाला होणाऱ्या विरोधास कंटाळून उचलले टोकाचे पाऊल)

मुलीच्या काकांनी सांगितले की, गेल्या वर्षापासून हा युवक मुलीला भेटण्यासाठी दिल्लीला येत होता. त्याचे दिल्लीला येणे-जाणे होते. तेव्हापासूनच आम्हाला संशय आला होता. आम्ही त्याला विचारले तेव्हा त्याने आपल्या या संबंधांबद्दल सांगितले. पुढे तो असेही म्हणाला की, आम्ही दोघे लग्न करणार आहोत. त्याचे हे विचार ऐकून आम्ही आश्चर्यचकीत झालो. आम्ही सर्व कुटुंबीयांनी मिळून दोघांनाही या विचारापासून प्रवृत्त होण्याबात प्रयत्न केले. आम्ही त्याला पुन्हा आपल्या गावी जाण्यासही सांगितले होते.