Teacher Dies By Suicide In Kolkata: कोलकातामध्ये फेसबुक लाईव्ह करून शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या; व्यवस्थापनावर केला मानसिक छळाचा आरोप

हे प्रकरण कोलकात्याच्या बराकपूर पोलीस स्टेशनच्या दक्षिणेश्वरचे आहे. खालसा मॉडेल सीनियर सेकेंडरी स्कूलमधील शिक्षिका जसबीर कौर यांनी दक्षिणेश्वर येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी संध्याकाळी शिक्षिका जसबीर कौर लटकलेल्या अवस्थेत सापडल्या.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Teacher Dies By Suicide In Kolkata: पश्चिम बंगालमधील कोलकाता (Kolkata) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका शिक्षिकेने तिच्या सोशल मीडिया पेजवर लाईव्ह येऊन आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची चौकशी करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण कोलकात्याच्या बराकपूर पोलीस स्टेशनच्या दक्षिणेश्वरचे आहे. खालसा मॉडेल सीनियर सेकेंडरी स्कूलमधील शिक्षिका जसबीर कौर यांनी दक्षिणेश्वर येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी संध्याकाळी शिक्षिका जसबीर कौर लटकलेल्या अवस्थेत सापडल्या.

फेसबुकवर लाईव्ह येऊन शिक्षिकेने घेतला गळफास -

आत्महत्या करण्यापूर्वी जसबीर कौरने तिच्या सोशल मीडिया अकाउंट फेसबुकवर एक लाईव्ह व्हिडिओ पोस्ट केला होता. लाईव्हमध्ये शिक्षिका जसबीर कौर यांनी खालसा मॉडेल सीनियर सेकेंडरी स्कूल व्यवस्थापनावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला. शिक्षिका जसबीर कौर यांनी लाईव्हमध्ये सांगितले होते की, शाळेच्या नवीन व्यवस्थापन समितीच्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात मी आवाज उठवला. त्यामुळे माझा छळ होत आहे. निवृत्तीला केवळ दीड वर्ष शिल्लक असताना त्यांच्याकडून बीएड प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. त्यानंतर पर्याय नसल्याचे सांगत शिक्षिकेने आत्महत्या केली. (हेही वाचा -Latur Teacher Suicide With Family: धक्कादायक! लातूर येथील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या)

जसबीर कौरच्या पतीची 2003 मध्ये हत्या झाली होती. त्यानंतर त्या दक्षिणेश्वरच्या मैत्रीमंदिर लेनमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांची दोन मुले परदेशात राहतात. खालसा मॉडेल सीनियर सेकेंडरीमध्ये गेली 22 वर्षांपासू त्या शिकवत होत्या. एवढेच नाही तर त्या या शाळेच्या माजी विद्यार्थिनीही होत्या. मात्र आता शाळा प्रशासनाकडून सतत छळ होत असल्याने त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. (हेही वाचा -World Suicide Prevention Day: भारतामध्ये तरुण लोक करतात सर्वाधिक आत्महत्या; मानसिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे- Expert)

दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने याप्रकरणी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एकटी राहिल्याने आणि बीएड प्रमाणपत्र नसल्यामुळे ती नैराश्यात असल्याचे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. तथापी, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. याप्रकरणी शिक्षिकेचा भाऊ जसबिंदर सिंग याने शाळा व्यवस्थापनाविरुद्ध दक्षिणेश्वर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक -

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीही मानसिक संकटाचा सामना करत असल्यास

988 सुसाइड अँड क्रायसिस लाइफलाइनला 988 वर कॉल करा. या क्रमांकावर तुम्हाला आत्महत्येच्या संकटात किंवा भावनिक संकटात असलेल्या कोणालाही 24 तास मदत दिली जाते. तसेच तुमची माहिती गोपनीय ठेवली जाते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now