Air India Express Offers: एअर इंडियाकडून फ्लाईट तिकीटवर खास ऑफर. 1799 रुपयांत विमान प्रवास

एअर इंडियाची ही खास ऑफर वर्षभरासाठी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत बेंगळुरू-चेन्नई, दिल्ली-जयपूर, बेंगळुरू-कोची, दिल्ली-ग्वाल्हेर आणि कोलकाता-बागडोगरा असा फक्त 1799 रुपयांमध्ये प्रवास करण्याची संधी मिळत आहे.

Air India Express Offers: एअर इंडियाकडून फ्लाईट तिकीटवर खास ऑफर. 1799 रुपयांत विमान प्रवास
Air India (PC - Twitter)

एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) प्रवाशांसाठी खास मोहीम सुरू केली आहे.  एअर इंडिया या मोहिमेचं नाव 'टाईम टू ट्रॅव्हल' (Time to Travel) असं आहे. या मोहिमेद्वारे प्रवाशांना विमान तिकीटावर खास सवलत देण्यात येणार आहे. आता प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानाने फक्त 1799 रुपयांमध्ये देशाच्या अनेक भागात जाता येणार आहे. एअरलाइन्सची ही ऑफर 11 जानेवारी 2024 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीसाठी असणार आहे.

एअर इंडियाची ही खास ऑफर वर्षभरासाठी सुरू करण्यात आली आहे.  प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत बेंगळुरू-चेन्नई, दिल्ली-जयपूर, बेंगळुरू-कोची, दिल्ली-ग्वाल्हेर आणि कोलकाता-बागडोगरा असा फक्त 1799 रुपयांमध्ये प्रवास करण्याची संधी मिळत आहे.

पाहा पोस्ट -

दरम्यान विस्तारानेही आपल्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त विमान प्रवाशांसाठी विशेष सवलतीची घोषणा केली आहे. विस्ताराच्या या ऑफरनुसार अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर प्रवाशांना विशेष सवलत ही मिळणार आहे.

या दोन्ही एअरलाईन्सची मालकी ही टाटाकडे असून टाटा ग्रुप सध्या एव्हिेशन सेक्टरमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2024 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).