Tamil Nadu Woman Ends Life: 'आईचं काळीज' पोरासाठी काहीही करु शकतं; लेकाच्या भल्यासाठी माऊलीची बसखाली उडी, सरकारी भरपाईसाठी जीवावर उदार

एक माऊली आपल्या मुलासाठी जीवावर उदार झाली. केवळ आपल्या मुलाचे भले होईल, आपल्या मृत्यूनंतर त्याला सरकारी मदत मिळेल आणि त्याचे आयुष्य चांगले होण्यासाठी हातभार लागेल यासाठी एका महिलेने चक्क धावत्या बसखाली उडी घेत आपले आयुष्य संपवले. ही घटना तामीळनाडू राज्यातील सेल येथे घडली. पप्पथी असे महिलेचे नाव असून ती 45 वर्षांची होती.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Tamil Nadu Woman Suicide: मुलाला पाठीवर घेऊन लढाई करणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई, मुलाच्या आठवणीने व्याकूळ झालेली हिरकणी आजवर आपण इतिहासात वाचली, ऐकली आहे. अशीच एक माऊली आपल्या मुलासाठी जीवावर उदार झाली. केवळ आपल्या मुलाचे भले होईल, आपल्या मृत्यूनंतर त्याला सरकारी मदत मिळेल आणि त्याचे आयुष्य चांगले होण्यासाठी हातभार लागेल यासाठी एका महिलेने चक्क धावत्या बसखाली उडी घेत आपले आयुष्य संपवले. ही घटना तामीळनाडू राज्यातील सेल येथे घडली. पप्पथी असे महिलेचे नाव असून ती 45 वर्षांची होती.

पप्पथीच्या शेजाऱ्याच्या हवाल्याने द क्विंटने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पाठिमागील अनेक दिवसांपासून ती सतत तणावात असायची. तिला नेहमीच मुलांची काळजी असायची. मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याची शालेयी शुल्क भरण्यासाठी तिने आगोदरच कर्ज घेतले होते. पप्पथीने आत्महत्या केल्याला जवळपास एक महिना झाला. 28 जून रोजी बसने चिरडल्याने तिचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज 17 जुलै रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. (हेही वाचा, Chitrakoot Waterfall: मोबाईल दिला नसल्याचा राग, तरुणीचा चित्रकूट धबधब्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न)

पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान आढळून आले की, महिलेची कोणीतरी फसवणूक केली आहे. कोणीतरी तिचा समज करुन दिला की, तिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकते. नुकसानभरपाईची रक्कम 45,000 रुपये असू शकते. त्या गैरसमजातून तिने जीवावर उदार होऊन आत्महत्या केली असावी. मात्र, तिचा मुलगा रुबथरनने हा दावा फेटाळून लावला आहे. रुबथरानने म्हटले आहे की, माझ्या शालेय फीसाठी आईने आत्महत्या केली वगैरे बातम्या खोट्या आहेत. त्यामुळे मुलाच्या भविष्यासाठी आईने आत्महत्या केली हा कोणी बनावत रचला नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. खरे खोटे तपासातच पुढे येऊ शकणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement