Tamil Nadu Assembly Election 2021 Exit Polls Results: तामिळनाडू विधानसभा निवडणूक मध्ये जनमताचा कौल कोणाला? पहा एक्झिट पोल्स निकाल

पूर्ण बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला कमीत कमी 118 जागांवर विजयी होणे आवश्यक आहे. यंदाच्या निवडणूकीत कोणता पक्ष बाजी मारणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. तत्पूर्वी, जनमताचा कौल नेमका कोणाला आहे, याचा अंदाज एक्झिट पोल द्वारे आज येईल.

Elections | (Photo Credits: PTI)

तामिळनाडू विधानसभा निवडणूक (Tamil Nadu Assembly Election) 2021 साठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. एकूण 234 मतदारसंघांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान झाले असून 2 मे रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. पूर्ण बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला कमीत कमी 118 जागांवर विजयी होणे आवश्यक आहे. यंदाच्या निवडणूकीत कोणता पक्ष बाजी मारणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. तत्पूर्वी, जनमताचा कौल नेमका कोणाला आहे, याचा अंदाज एक्झिट पोल द्वारे आज येईल.

तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 24 मे 2021 रोजी संपुष्टात येईल. सध्या तामिळनाडूमध्ये सध्या ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (ADMK)पक्षाचं सरकार आहे. यंदाच्या निवडणूकीत भाजप, काँग्रेस यांच्यासोबतच अन्य स्थानिक पक्षांमध्ये लढत झाली. सध्या स्थानिक पक्ष द्रविड मुनेत्र कळघम (DMK) यांची काँग्रेस सोबत आघाडी असून भाजप आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (ADMK) यांची भाजपसोबत युती आहे. यापैकी जनता नेमकी कोणाला पसंती देईल, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

एक्झिट पोल्स निकाल:

1.रिपब्लिक CNX

AIADMK- 58-68

DMK- 160-170

इतर- 5-7

2. न्यूज 24

AIADMK- 175

DMK- 57

इतर- 2

3. एबीपी 

AIADMK-+ BJP- 58-70

DMK+Congress- 160-172

इतर- 07

4. इंडिया टुडे

AIADMK- 38-54

DMK- 175-195

AMMK- 1-2

MNM- 0-2

इतर- 0-3

राज्यात एकूण 6 कोटी 28 लाख 749 मतदार असून 72.78 टक्के मतदान झाले आहे. DMK चे नेतृत्व एम. के. स्टालिन करत असून त्यांनी कोलाथूर येथून निवडणूक लढवली आहे. त्यांच्या मतदारसंघात 60.52 टक्के इतकेच मतदान झाले आहे. साऊथचे प्रसिद्ध सुपरस्टार कमल हसन हे पक्ष मक्कल नीधि माईम मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी दक्षिण कोयंबटूर येथून निवडणूक लढवली असून त्या ठिकाणी 60.72 टक्के मतदान झाले आहे.

विशेष म्हणजे द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (ADMK) दोन्ही पक्षांचे सर्वेसर्वा असणाऱ्या अनुक्रमे करुणानिधी आणि जयललिता या दोन मोठ्या नेत्यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे यांच्याशिवाय पार पडणारी ही पहिलीच निवडणूक आहे.