केरळ चे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची कन्या वीणा अडकली विवाहबंधनात, Watch Photos

तिरूअनंतपुरम मध्ये हा विवाहसोबहळा संपन्न झाला आहे. वीणा आणि रियाज दोघांचे घटस्फोट झाले असून, दोघांचे हे दुसरे लग्न आहे.

CM Pinarayi VIjayan Daughter Knot (Photo Credits: ANI)

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांची कन्या वीणा आज सीपीआय-एम युवा संघटनेच्या डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद रियाझ (Mohammed Riyaz) यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाची बरीच चर्चा होती. या लग्नात दोन्ही कुटूंबातील मोजकीच लोक उपस्थित होते. तिरूअनंतपुरम मध्ये हा विवाहसोबहळा संपन्न झाला आहे. वीणा आणि रियाज दोघांचे घटस्फोट झाले असून, दोघांचे हे दुसरे लग्न आहे. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मोहम्मद रियाझ हे एक विद्यार्थी नेते असून, वीणा बंगळूरमधील स्टार्टअप फर्मची व्यवस्थापकीय संचालक आहे.

मोहम्मद रियाझ हे केरळमधील कोझिकोड येथील रहिवासी असून, सीपीएम राज्य समितीचे सदस्य आहेत. तर, 37 वर्षीय वीणा बंगळुरूमध्ये एक्सालॉजिक नावाची सॉफ्टवेअर कंपनी चालवते. यापूर्वी तिने ओरॅकल येथे आठ वर्षे काम केले आहे. या व्यतिरिक्त तिने आरपी टेकसॉफ्टमध्ये दोन वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. 2015 मध्ये तिने आपली स्टार्टअप कंपनी सुरू केली. केरळचे मुख्यमंत्री Pinarayi Vijayan यांच्या कन्येचा 15 जून रोजी विवाह; जाणून घ्या कोण आहेत पिनाराई विजयन यांचे होणारे जावई

वीणा आणि मोहम्मद यांचे पाच वर्षांपूर्वीच दोघांचे घटस्फोट झाले आहेत. त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पहिल्या लग्नापासून वीणाला मुलगा आहे तर रियाझही दोन मुलांचा पिता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif