Swiggy 24x7 Free Delivery: स्विगी इंस्टामार्ट कडून Delhi, Gurgaon,Noida मध्ये मिळणार 24 तास सेवा

सणामध्ये शेवटच्या क्षणी लागणार्‍या वस्तूंसाठी धावपळ करावी लागणार नाही. यामध्ये ग्रॉसरी म्हणजे घरातील वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी आणि गिफ्ट मिळतील.

Photo Credit: Wikimedia Commons

Swiggy कडून आता आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर Delhi NCR भागामध्ये Instamart द्वारा घरातील रोजच्या व्यवहारातील वस्तूंची डिलेव्हरी 24 तास होणार आहे. त्यामुळे आता अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये लोकांना रात्री-अपरात्री देखील घरपोच वस्तूंच्या डिलेव्हरीची सोय मिळणार आहे.

दिल्ली, गुडगाव आणि नोएडा मध्ये स्विगीच्या युजर्सना आता फ्री डिलेव्हरी मिळणार आहे. त्यामध्ये ग्राहक ग्रॉसरी, स्नॅक्स आणि अन्य पदार्थ पाठवले जाणार आहेत. त्यामुळे आता विना ताण सेवा मिळणार आहे.

स्विगीच्या डेटा नुसार, रात्री उशिरा खरेदीमध्ये काही इंटरेस्टिंग ट्रेंड्स आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लोक रात्री 11 ते सकाळी 6 च्या दरम्यान चिप्स, भुजिया आणि आइस्क्रीम सारख्या स्नॅक्सची ऑर्डर देतात. उशिरा रात्रीच्या वस्तूंमध्ये sexual wellness products चा समावेश आहे. जसजशी रात्र सकाळमध्ये बदलते, तसतसे दूध आणि अंडी यांसारख्या न्याहारीच्या मुख्य पदार्थांवर त्यांचा मोर्चा वळतो. प्रामुख्याने या वस्तू सकाळी लवकर मागवल्या जातात.

सध्या या 24x7 free delivery service च्या लॉन्च साठी Swiggy Instamart वर video advertisement देखील जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये स्विगी आता रात्री अपरात्री कशी सुविधा देणार त्याची माहिती दिली आहे. युट्युब वर तुम्हांला ही जाहिरात पाहता येणार आहे.