Sushant Singh Rajput: कूपर रुग्णालयात सुशांत चा मृतदेह पाहुन रिया चक्रवर्ती हिने उच्चारले 'हे' शब्द

14 जुन रोजी सुशांत स्वतःच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळुन आल्यावर त्याला कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) पोस्टमॉर्टम साठी नेण्यात आले होते यावेळी रिया चक्रवर्ती ही सुद्धा हॉस्पिटल मध्ये पोहचली होती, रियाने सुशांतचा मृतदेह पाहुन काय प्रतिक्रिया दिली हे सुरजीत राठोड यांंनी सांगितले आहे.

Sushant Singh Rajput, Rhea Chakraborty (Photo Credits: Instagram)

सुशांंत सिंंह राजपूत च्या मृत्यु (Sushant Singh Rajput Death) प्रकरणात सीबीआय (CBI) कडे तपासाची सुत्रे सोपावण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court)  या संंदर्भातील निर्णय समोर आल्या पासुन पुन्हा एकदा सुशांंतची पुर्व गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakrobarty) हिचे नाव चर्चेत आले आहे.याच सर्व पार्श्वभूमीवर सध्या करणी सेना (Karni Sena) सदस्य सुरजीत राठोड (Surjeet Rathore) यांनी ANI या वृत्तसंस्थेला एक खास माहिती दिली आहे. 14 जुन रोजी सुशांत स्वतःच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळुन आल्यावर त्याला कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) पोस्टमॉर्टम साठी नेण्यात आले होते यावेळी रिया चक्रवर्ती ही सुद्धा हॉस्पिटल मध्ये पोहचली होती, रियाने सुशांतचा मृतदेह पाहुन काय प्रतिक्रिया दिली हे सुरजीत राठोड यांंनी सांगितले आहे. Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे WhatsApp Chats लीक, सोशल मीडियात ट्रोल झाले दिग्दर्शक

सुरजीत राठोड यांच्या माहितीनुसार, करणी सेनेच्या राज्यप्रमुखांनी सांगितल्यानुसार ते 15 जूनला कूपर रुग्णालयात गेले होते. रियाला सुशांत ला पाहायचे होते त्यासाठी कर्मचार्‍यांना विनंती करण्यात आली होती. परवानगी मिळताच सुशांत सिंह राजपूत जवळ जाउन तिने त्याच्या छातीवर हात ठेवला होता.आणि 'सॉरी बाबू' इतकेच म्हणाली.

ANI ट्विट

दरम्यान, सुशांंत च्या मृत्यु प्रकरणी तपास करण्यासाठी सीबीआयची टीम मुंंबईत दाखल झाली आहे. रिया सहित सर्वांंची चौकशी केली जाण्याचे अंदाज आहेत, सध्या सांताक्रुझ येथे गेस्ट हाउस मध्ये ही टीम राहत असुन तिथेच सुशांतशी संबधित लोकांची चौकशी होत आहे.

दुसरीकडे सुशांतच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर रियाला दोषी ठरवुन अगोदरच आपला निर्णय दिला आहे मात्र जोवर सीबीआय तर्फे यासंदर्भात अधिकृत तपास व माहिती समोर येत नाही तोपर्यंत सुशांतला न्याय मिळवुन देण्यासाठी आंंदोलने करणारर्‍या फॅन्स ना धीर धरावा लागणार आहे.