Supreme Court on Delhi Pollution: दिल्लीकरांच्या आरोग्याशी खेळू नका, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.
दिल्लीतील हवा विषारी बनत चालली असून यामुळे दिल्लीकरांना सध्या आरोग्याच्या अनेक समस्येंचा सामना हा करावा लागत आहे. हवेची पातळी घसरल्याने दिल्लीकरांना अनेक व्य़ाधी जडल्या आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये सतत वाढत असलेल्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारवर खडे बोल सुनावले आहेत. पंजाबमध्ये शेतांमध्ये आग लावण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. केवळ दोषारोप करायला हा राजकीय विषय नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. (Firecrackers Ban In India: यंदा दिवाळीत फटाके फोडण्यासंदर्भात नियमावली? सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश)
सर्व राज्य सरकारना याआधीच प्रदूषण रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणतेही राज्य त्यांच्याकडे आदेश नाही असे म्हणू शकत नाही. प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी आणि पालन करणे महत्त्वाचे महत्त्वाचे आहे, असे न्यायमूर्ती संजय किसन कौल यांनी म्हटले आहे. शेतांमध्ये पालापाचोळा जाळल्यामुळेच दिल्लीचे प्रदूषण वाढत आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र, दिल्लीचे प्रदूषण वाढवणारा तो एक महत्त्वाचा घटक आहे.
पंजाबच्या वकिलांनी सरकारची बाजू माडताना शेतात पालापाचोळा जाळण्याची समस्या काही दिवसांपुरतीच असल्याचा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. हा एक छोटासा मुद्दा असेल पण त्याचं गांभीर्य खूप मोठं आहे. असे म्हटले आहे.