Nirbhaya Gang Rape Case: निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश याची फाशी अटळ; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका
याचा अर्थ आता चौघांची फाशी निश्चित झाली आहे. मुकेश याने राष्ट्रपतींनी त्याची दयेची याचिका फेटाळल्यानंतर मुकेशने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र आज सुप्रीम कोर्टाने त्याची ही याचिकाही फेटाळली आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाचा लवकरच शेवट होणार आहे. 1 फेब्रुवारीला या प्रकरणातील उरलेल्या 5 आरोपींपैकी 4 आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. तर त्यातील एक अल्पवयीन आरोपी हा बालसुधारगृहात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय, मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या चारही जणांना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. यातील मुकेश ची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. याचा अर्थ आता चौघांची फाशी निश्चित झाली आहे. मुकेश याने राष्ट्रपतींनी त्याची दयेची याचिका फेटाळल्यानंतर मुकेशने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र आज सुप्रीम कोर्टाने त्याची ही याचिकाही फेटाळली आहे.
सरकारी वकिलांनी सांगितले की, दिल्ली सरकारने आरोपींशी संबंधित सर्व रेकॉर्ड राष्ट्रपतींना पाठवले होते. ते पाहून त्यांनी या चौघांची याचिका तात्काळ फेटाळली. तसेच तुररुंगात झालेले शोषण हे दया याचिकेला आव्हान देण्याचा आधार होऊ शकत नाही असेही ते म्हणाले.
ANI चे ट्विट:
हेदेखील वाचा- Nirbhaya Gang Rape Case: निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी लाईव्ह टेलिकास्ट करा; 'परी' संस्थेची मागणी
सुप्रीम कोर्टाने मुकेश आणि सरकारची बाजू ऐकल्यानंतर हा निकाल दिला आहे. तर दुसरीकडे मुकेशच्या वकिलांनी सांगितले की, मुकेश या गुन्ह्यात सामील नव्हता. तो तेवहा केवळ बस चालवत होता. उलट तुरुंगात त्याच्यावर अनैसर्गिक शारीरिक शोषण करण्यात आले.