Chief Election Commissioner of India म्हणून सुनील अरोरा यांनी स्वीकारला पदभार
ओम प्रकाश रावत (Om Prakash Rawat) निवृत्त झाल्याने त्यांच्याकडील कारभार आता सुनिल अरोरा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner of India) म्हणून सुनील अरोरा (Sunil Arora) यांनी आज पदभार स्वीकारला आहे. ओम प्रकाश रावत (Om Prakash Rawat) निवृत्त झाल्याने त्यांच्याकडील कारभार आता सुनिल अरोरा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मागील महिन्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी सुनिल अरोरा यांची नियुक्ती केली होती. अरोरा हे निवृत्त अधिकारी आहेत. 23 वे भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
राजस्थानच्या IAS कॅडर अधिकारी आहेत. 2019 च्या आगामी लोकसभा निवडणुका सुनील अरोरा सांभाळणार आहेत. सोबतच पुढील वर्षी होणाऱ्या सात राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी देखील अरोरांकडे आहे. जम्मू- काश्मीर, ओडिसा, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्किम विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. पुढील अडीच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.