Sugar Production: देशात साखरेचं उत्पादनात घटलं, महाराष्ट्रासह कर्नाटकमध्येही उत्पादन कमी

महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य आहे.

Sugar | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

यावर्षी भारताच्या साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात सहा टक्क्यांनी घट झाली असून 3 कोटी 11 लाख टनांवर आलं आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) याबाबतची माहिती दिली आहे. 15 एप्रिलपर्यंत देशात साखरेचे उत्पादन घटल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या साखरेच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. महाराष्ट्र हे  देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य आहे.  गेल्या हंगामात महाराष्ट्रात 1 कोटी 26.5 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. ते यावर्षी 1.5 कोटी दशलक्ष टनांवर आलं आहे. तर कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 58 लाख टनांवरुन 55.3 लाख टनांवर आले आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार गेल्या हंगामात उत्तर प्रदेशमध्ये 94.4 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यावेळी 1 ऑक्टोबर 2022 ते 15 एप्रिल 2023 पर्यंत 96.6 लाख टन साखरेचं झालं आहे. उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन वाढले आहे. उत्तर प्रदेश हे साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. यावर्षी देशात 3.40 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होऊ शकते, तर गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन हे 3.58 दशलक्ष टन झाले होते. साखर उत्पादनात झालेली घट ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. ब्राझीलनंतर भारत हा जगातील दुसरा साखर उत्पादक देश आहे.