Share Markets: आरबीआयने रेपो दर वाढवताच, शेअर बाजार कोसळला; जाणून घ्या घडामोडी
आरबीआय (RBI) गवर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली. ही घोषणा होताच पुढट्या काहीच मिनीटांमध्ये शेअर बाजार (Stock Market) गडगडण्यास सुरुवात झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अचानक राबवलेले धोरणाचा मोठा फटका आज शेअर बाजाराला बसल्याचे तज्ज्ञ सांगतात.
आरबीआय (RBI) गवर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली. ही घोषणा होताच पुढट्या काहीच मिनीटांमध्ये शेअर बाजार (Stock Market) गडगडण्यास सुरुवात झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अचानक राबवलेले धोरणाचा मोठा फटका आज शेअर बाजाराला बसल्याचे तज्ज्ञ सांगतात. दुपारी 2.45 वाजेपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही जोदार आपटी खाताना दिसले. प्रामुख्याने सेन्सेक्स 1,400 तोट्यात जाताना दिसला. तर निफ्टीही 400 अंकानंतर घसरताना पाहायाल मिळाला. दुपारी 2.55 पर्यंत सेन्सेक्स 1,413.6 अंकांनी म्हणजेच 2.48% घसरला. हे वृत्त लिहीपर्यंत तो 55,562.34 इतक्या पातळीवर आला. तर निफ्टी या काळात 394.75 अंक म्हणजेच − 2.31% नी घसरला. शेवटी तो 16,674.35 वर स्थिरावला.
आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने (RBI MPC) बुधवारी रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉइंट म्हणजेच 0.4% वाढ केली. त्यामुळे रेपो रेट 4.4% झाला. ही वाढ सातत्याने वाढत्या महागाईला निमंत्रण देणार असे तज्ज्ञ म्हणून लागले आहेत. शेअर बाजारात आज सकाळपासूनच घसरण पाहायला मिळली. सुरुवातीला बाजारात काही चढउतार पाहायाला मिळाला. मात्र, त्यानंतर व्यवहार स्थिरता दाखवू लागले.सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा सेंसेक्स 63.69 अंक म्हणजेच 0.11% टक्क्यांसह 57,039.68 वर होता. तर निफ्टी 23.90 अंक म्हणजे 0.14% झेप घेऊन 17,093 वर उघढला. दरम्यान, त्यात पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली. पुढे बाजार बंद होईपर्यंत ही घसरण सुरुच होती. (हेही वाचा, LIC IPO: एलआयसी आयपीओ बाजारात दाखल होण्यास सज्ज, पॉलिसी होल्डर्सला किती मिळणार सवलत? घ्या जाणून)
बाजार सुरु झाला तेव्हा निफ्टीमध्ये ब्रिटानिया, ओएनजीसी, टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो या समभागांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळली. तर हिंडाल्को, अपोलो हॉस्पिटल्स, भारती एयरटेल आदी समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्सबाबत बोलायचे तर, डॉ.रेड्डीज, टाइटन, सन फार्मा, रिलायंस इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचजीएफसी आदी समभाग घसरले. दुसऱ्या बाजूला सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड, एनटीपीसी, इंफोसिस आणि विप्रो वधारताना पाहायला मिळाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)