Coronavirus: कर्नाटकात 4 मे पासून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये Containment Areas सोडून सुरु होणार स्वतंत्र दारूची दुकाने; जाणून घ्या Liquor Stores ची वेळ
मात्र सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करीत ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग, व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील लॉक डाऊन (Lockdown) 17 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. मात्र सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करीत ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग, व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशात कर्नाटकात (Karnataka) 4 मे, सोमवारपासून कंटेन्मेंट झोन (Containment Zones) वगळता इतर ठिकाणी स्वतंत्र दारूची दुकाने सुरू होणार आहेत. यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री, एच नागेश (H Nagesh) यांनी याबाबत माहिती दिली. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, परिसर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागली गेली आहेत.
एएनआय ट्विट -
त्यानुसार आता ग्रीन झोनमधील सर्व दुकाने उघडणार आहेत. कर्नाटक राज्यात सर्वाधिक कमाई करून देणारा व्यवसाय म्हणून दारू विक्रीकडे पहिले जाऊ शकते. राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यातही या व्यवसायाचा फार मोठा हात आहेत. चालू आर्थिक वर्षात सरकारने याबाबत 22,700 कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून लॉक डाऊनमुळे राज्यातील दारू विक्री पूर्णतः बंद होती. मात्र आता कोरोना व्हायरसचा प्रकोप थोडा कमी झाला असल्याने सरकारने कंटेन्मेंट झोन सोडून इतर ठिकाणी दारू विक्रीची परवानगी दिली आहे.
गृह मंत्रालयाने (MHA) आपल्या आधीच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर, लगेचच कर्नाटक सरकारने याबाबतची घोषणा केली. एमएचएने पूर्वी जारी केलेल्या आदेशानुसार केवळ ग्रीन झोनमध्येच दारू विक्रीस परवानगी देण्यात आली होती. मात्र केंद्राने आज जारी केलेल्या स्पष्टीकरणात, याबाबत पुष्टी केली गेली की ऑरेंज झोनमध्येही दारूची दुकाने कार्यरत राहू शकतात.
(हेही वाचा: Coronavirus Lockdown: लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या 17 मे पर्यंत नागरिकांसाठी रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहणार)
शुक्रवारी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात, राज्यात लवकरात लवकर व्यवसाय व आर्थिक कामे सुरु होतील असे सांगितले होते. तसेच याबाबत वाणिज्य व उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींशीही बैठक झाली असल्याने, कामगारांनी आपल्या मूळ गावी परत न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते.