भारतात COVID-19 रुग्णांची संख्या 70,000 च्या पार, 3604 नव्या कोरोना बाधितांसह एकूण आकडा 70,756

गेल्या 24 तासात देशात 3604 नवे कोविड-19 आढळले असून एकूण संख्या 70,756 इतकी झाली आहे. सद्य स्थितीत राज्यात एकूण 46,008 रुग्णांवर उपचार सुरु असून 22,455 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूचे जाळे दिवसेंदिवस अधिकाधिक पसरत चालले असून आता देशातील रुग्णांच्या संख्येने 70 हजारांच्या टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात देशात 3604 नवे कोविड-19 आढळले असून एकूण संख्या 70,756 इतकी झाली आहे. सद्य स्थितीत राज्यात एकूण 46,008 रुग्णांवर उपचार सुरु असून 22,455 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर आतापर्यंत 2293 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. ही आकडेवारी पाहता देशातील कोरोनाची स्थिती अधिक गंभीर बनत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला असून हा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून सर्व शासकीय आणि वैद्यकिय यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहेत. गोवा येथून जवळजवळ 2100 स्थलांतरित कामगारांना घेऊन जम्मू-कश्मीरसाठी 2 विशेष गाड्या रवाना- प्रमोद सावंत

देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून सद्य स्थितीत राज्यात 23, 401 कोरोना संक्रमित असून 868 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तर त्यापोठापाठ गुजरात, तमिळनाडू आणि नवी दिल्लील सवधिक कोरोना रुग्ण असल्याचमी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

तमिळनाडूमध्ये सद्य स्थितीत 8002 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोना विषाणूची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्यामुळे आतापर्यंत लॉकडाऊन देखील वाढत चालले आहे. यामुळे अनेक स्थलांतरित मजूरांनी गावचा रस्ता धरला आहे. या मजूरांनी त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेने आतापर्यंत 450 श्रमिक स्पेशल रेल्वे सोडल्या असून 5 लाखांहून अधिक स्थलांतरित मजूरांना त्यांच्या निश्चित स्थळी सोडले आहे. ही माहिती रेल्वे कार्यकारी संचालक आर.डी.बाजपेयी यांनी दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif