भारतात 3277 नव्या COVID-19 रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची संख्या 62,939 वर
यात 41,472 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 19,358 रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत देशात एकूण 2109 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.
भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूने अक्षरश: हैदोस घातला असून दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात 3277 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 127 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. सद्य स्थितीत भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 62,939 वर पोहोचली आहे. यात 41,472 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 19,358 रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत देशात एकूण 2109 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.
सद्य स्थितीत देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात येथे 20,228 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात आणि दिल्ली मध्ये सवाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात काल 1165 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harsh Vardhan) यांनी भारत सरकारच्या वतीने देश कोरोनाशी लढा देण्यास समर्थ आहे असा विश्वास दर्शवला आहे. इतर अनेक विकसित देशांप्रमाणे आपल्या देशातही कोरोनामुळे (Coronavirus) भीषण परिस्थिती निर्माण होईल असे म्हणत नाही आहोत मात्र जर का अशी परिस्थिती किंबहुना वाईटात वाईट परिस्थिती उद्भवली तरी देश हा लढा देण्यासाठी तयार आहे अशा शब्दात डॉ. हर्षवर्धन यांनी विश्वास व्यक्त केला आहे
महाराष्ट्रात मुंबई, पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईतील धारावी, वरळी, दादर आदी ठिकाणं हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. धारावीत आज कोरोनाचे 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच एका कोरोना रुग्णाचा बळी गेला आहे. धारावीत आतापर्यंत 833 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे.