राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी सुरु करण्यात येणार स्पेशल कोचेस, या कोचेसमधील असतील महिलांसाठी विशेष सोयी सुविधा
राजधानी(Rajdhani Express), दुरांतो (Duranto Express) आणि शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express) आणखी एक पाऊल पुढे टाकत महिलांसाठी विशेष कोच सुरु करणार असल्याचे एजन्सी रिपोर्टनुसार सांगण्यात येतय
प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या राजधानी(Rajdhani Express), दुरांतो (Duranto Express) आणि शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express) आणखी एक पाऊल पुढे टाकत महिलांसाठी विशेष कोच सुरु करणार असल्याचे एजन्सी रिपोर्टनुसार सांगण्यात येतय. रेल्वे प्रशासनाचा नेहमीच ह्या तीन महत्त्वाच्या रेल्वेमध्ये नवनवे बदल करण्याचा प्रयत्न असतो. त्यात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष आरक्षित महिला कोच सुरु करणे हे एक्सप्रेससाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.
एजन्सी रिपोर्टनुसार, हे डब्बे Link Hofmann Bosch (LHB) द्वारे तयार करण्यात येतील. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ह्या रेल्वेमध्ये 2 LHB पॉवर असलेले कोचेस असतील, ज्या संपूर्ण रेल्वेला वीजपुरवठा करतील तसेच वातानुकूलित करतील. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, संपुर्ण रेल्वेला LHB पॉवर असलेला 1 कोच पुरेसा असतो, मात्र इथे अतिरिक्त जागा असल्यामुळे आणखी एक अपग्रेडेड कोच जोडला जात असून हा कोच केवळ महिलांसाठी आरक्षित असेल.
राजधानी ते राजधानी अर्थातच मुंबई ते दिल्ली रेल्वे प्रवास अधिक वेगवान
रेल्वेमंत्री पियूष गोयल संसदेत घोषणा केली होती की, रेल्वे प्रशासन सगळ्याच रेल्वेमधील जुने डब्बे हटवून त्याजागी नवीन अत्याधुनिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे LHB कोचेस बसवले जातील.