Shiv Jayanti 2023: डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि अभाविप यांच्यात संघर्ष, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हे या संघर्षाला निमित्त ठरले. अभाविपने रविवारी (19 फेब्रुवारी) आरोप केला की, डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची तोडफोड केली.

जेएनयू | (Photo Credit: ANI)

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पुन्हा एकदा डाव्या चळवळीतील (Left-Wing Workers) विद्यार्थी विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती हे या संघर्षाला निमित्त ठरले. अभाविपने रविवारी (19 फेब्रुवारी) आरोप केला की, डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची तोडफोड केली. त्यावरुन एबीव्हीपीने आंदोलनही केले. दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP ) लावलेल्या आरोपाचे नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (NSUI) खंडन केले आहे. जेएनयू एनएसयूआयचे सरचिटणीस गणपत चौधरी म्हणाले की, एबीव्हीपी सदस्यांनी जेएनयूएसयू कार्यालयात हे पोर्ट्रेट परवानगीशिवाय ठेवले होते, त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनी ते काढून टाकले.

ABVP JNU चे सचिव उमेशचंद्र अजमेरा यांनी डाव्या कार्यकर्त्यांवर आरोप करताना म्हटले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यांना आदरांजली म्हणून आम्ही विद्यार्थी केंद्राच्या बाहेर भिंतींवर शिवाजी महाराजांचे चित्र लावले होते. पण जेएनयूतील ‘कम्युनिस्ट’ हे पचवू शकले नाहीत. '100 फ्लॉवर्स ग्रुप' आणि SFI चे लोक आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केली. (हेही वाचा, Thackeray on Amit Shah: अमित शाह मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा क्रमांक एकचा शत्रू; 'सामना'तून 'मार्मिक' शब्दात टीका)

ट्विट

जेएनयू एनएसयूआयचे सरचिटणीस गणपत चौधरी पुढे म्हणाले, एबीव्हीपीच्या सदस्यांनी जेएनयू विद्यार्थी संघ कार्यालयात शिवाजीचे चित्र ठेवले होते, त्यासाठी जेएनयूएसयूच्या शिष्टमंडळाची परवानगी आवश्यक होती. तरीही त्यांनी ते बेकायदेशीरपणे केले. इतर विद्यार्थी तेथे आले आणि स्क्रीनिंग कार्यक्रमासाठी सर्व पोर्ट्रेट काढून टाकले. त्यामुळे दोन गटात मारामारी झाली. यापूर्वी, जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचा आरोप अभाविपने केला होता.