Serum Institute चे सीईओ Adar Poonawalla यांना 'Y' दर्जाची सुरक्षा; MHA चे आदेश
या सुरक्षेत 11 जणांची टीम असते यात एक किंवा दोन कमांडोज आणि पोलिसांचा समावेश असतो.
सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ (CEO) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांना संपूर्ण भारतभर वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. देशात 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, पुण्याची सीरम इंस्टीट्यूट ही देशातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. या आधारावर अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. दरम्यान, वाय सुरक्षेत 11 जणांची टीम असते यात एक किंवा दोन कमांडोज आणि पोलिसांचा समावेश असतो.
केंद्रीय राखीव पोलिस दल (Central Reserve Police Force) अदर पुनावाला यांना सुरक्षा प्रदान करेल. ते जिथे कुठे प्रवास करतील तिथे त्यांना वाय सुरक्षा दिली जाईल. (राज्य सरकारला 300 रुपयांना मिळणार Covishield लस; Serum Institute of India चे CEO अदर पुनावाला यांची माहिती)
ANI Tweet:
दरम्यान, सीरम इंस्टीट्यूटद्वारे कोविशिल्ड लस केंद्र सरकारला 150 रुपयांत तर राज्य सरकारला 400 रुपयांमध्ये उपलब्ध केल्यामुळे अदर पुनावाला यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता राज्य सरकारसाठी लसीची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे 400 ऐवजी 300 रुपयांना ही लस राज्य सरकारला उपलब्ध होईल, अशी माहिती अदर पुनावाला यांनी ट्विटद्वारे दिली आहे.