COVID-19 Vaccine Update: भारतामध्ये Serum Institute ला Oxford-AstraZeneca च्या लसीच्या पुन्हा मानवी चाचणी सुरू करायला DCGI कडून परवानगी

भारतामध्ये सीरम इन्सिट्युट ऑफ इंडिया कडून सुरू असलेल्या Oxford-AstraZeneca च्या कोविड 19 वरील संभाव्य लसीच्या थांबवण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायल्सच्या प्रक्रियेला आता DCGI कडून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Corona Vaccine| Photo Credits: SII Facebook & Pixabay.com

भारतामध्ये सीरम इन्सिट्युट ऑफ इंडिया कडून सुरू असलेल्या Oxford-AstraZeneca च्या कोविड 19 वरील संभाव्य लसीच्या थांबवण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायल्सच्या प्रक्रियेला आता DCGI कडून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता Serum Institute of India पुन्हा दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील ट्रायल्स म्हणजे मानवी चाचण्या करण्यासाठी उमेदवारांची भरती सुरू करू शकते. मात्र आता DCGI कडून त्यांना खास अटी शर्ती देखील देण्यात आल्या आहेत. COVID-19 Vaccine Update: Oxford-AstraZeneca च्या कोविड-19 वरील लसीच्या ट्रायल्सला युके मध्ये पुन्हा सुरुवात.  

DCGI ने सीरम इन्सिट्युटला स्क्रिनिंग आणि उमेदवाराला लस दिल्यानंतर त्याचे परिणाम नोंदवताना विशेष दक्षता घेण्याचं आवाहन केले आहे. तसेच प्रतिकूल परिणाम दिसल्यास व्यवस्थापनासाठी असलेल्या प्रोटोकॉलनुसार औषधांचा तपशील आता सीरम इन्स्टिट्युटला DCGI समोर सादर करावा लागणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी युके लस दिलेल्या एका व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम दिसू लागल्याने AstraZeneca या फार्मा कंपनीने मानवी चाचणी थांबवली होती. त्याच पार्श्वभूमीवर 11 सप्टेंबरला भारतामध्ये Serum Institute of India ला मानवी चाचणीसाठी पुढील आदेश मिळेपर्यंत नवी उमेदवार भरती थांबवण्याचे आदेश होते. COVID-19 Vaccine: कोविड19 वरील लस 2024 वर्षाच्या अखेर पर्यंत उपलब्ध होणार असल्याची सीरम इंस्टीट्युट प्रमुख अदार पूनावाला यांची माहिती

AstraZeneca ने SII सोबत त्यांच्या कोविड 19 वरील लसीच्या उत्पादनासाठी भागिदारी केली आहे. दरम्यान मंगळवारी (15 सप्टेंबर) Data and Safety Monitoring Board च्या रेकमेंडेशंस युके, भारत मध्ये सादर केल्या आहेत. त्यानुसार पुढील उमेदवारसाठी परवानगी द्यावी असं सांगण्यात आलं आहे.

आता नव्या नियमावलीनुसार SII ने देखील पुन्हा नवी participant information sheet बनवली आहे. त्यामध्ये सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाणार आहे. लसीचा डोस दिल्यानंतर आता 7 दिवस सेफ्टी फॉलोअप सादर केला आहे. यामध्ये अद्याप कुणावरही प्रतिकूल परिणाम नसल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये माईल्ड परिणाम आपोआप ठीक झाले आहे, तसेच त्याचे पुन्हा पुन्हा कोणते दुष्परिणाम दिसले नसल्याचं सांगण्यात आले आहे.