IPL Auction 2025 Live

पत्रकार अर्णब गोस्वामी विरूद्धच्या FIR रद्द करण्यासोबतच चौकशी CBI कडे हस्तांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने आज (19 मे) पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडून Palghar Mob-lynching वरील न्यूज शोमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह विधानांबद्दल दाखल करण्यात आलेल्या FIR ची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीला नकार दिला आहे.

Arnab Goswami - Supreme Court (Photo Credits: PTI)

सर्वोच्च न्यायालयाने आज (19 मे) पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami)  यांच्याकडून Palghar Mob-lynching वरील न्यूज शोमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)  यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह विधानांबद्दल दाखल करण्यात आलेल्या FIR ची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीला नकार दिला आहे. दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या FIR देखील रद्द करण्याला विरोध केला आहे. मात्र त्याला अटक करण्यापासून 3 आठवड्यांची सुरक्षा मिळाली आहे.  न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड आणि एम आर शाह यांनी 11 मे दिवशी अर्णब यांच्या विरोधातील  निकाल राखीव ठेवला होता. यामध्ये पालघर मॉब लिंचिंग सोबतच वांद्रे स्थानकाबाहेरील मजुरांच्या गर्दी प्रकरणाचा समावेश होता

पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी एका न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमामध्ये पालघर मधील मॉब लिंचिंग प्रकरणामध्ये सोनिया गांधींवर टीका करत त्यांना या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवले होते. तसेच आपल्याला काही झाल्यास त्यासाठी देखील सोनिया गांधीच जबाबदार असतील असं वक्तव्य केलं होतं. याप्रकरणानंतर महाराष्ट्रासह देशभरात त्याचे पडसाद उमटले. कॉंग्रेस कार्यकत्यांनी अर्णब गोस्वामीचा निषेध करत त्याच्या विरूद्ध सोशल मीडियामध्येही टीका केली आहे. दरम्यान त्यानंतर अनेक पोलिस स्थानकांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या नाम जोशी मार्गावरीलपोलिस स्थानकामध्ये कसून पोलिस तपास करण्यात आला होता. आपल्या चॅनलवरच्या एका कार्यक्रमादरम्यान अर्णब गोस्वामींनी समाजामध्ये तेढ पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्य केलं, सोनिया गांधींबाबत अपमानकारक भाषा वापरली असा कॉंग्रेसचा आरोप आहे.

PTI Tweet 

पालघर मध्ये तीन जणांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्याला काहींनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्र सरकार आणि पोलिस खात्याने हा आरोप फेटाळून लावत अफवा आणि गैरसमजुतीमधून ही मारहाण केल्याचं म्हटलं आहे. सध्या या प्रकरणी 115 जण पोलिस ताब्यात असून काही पोलिसांना निलंबित देखील केले आहे.