SBI च्या ग्राहकांना झटका, बँकेकडून बचत खात्यावरील व्याजदरात कपात

त्यानुसार बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेकडून याबाबत अधिक माहिती देण्यात आली असून त्यांनी असे म्हटले आहे की, खात्यात जमा असलेल्या एक लाख रुपयांवर 0.25 टक्के कमी व्याज मिळणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना झटका दिला आहे. त्यानुसार बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेकडून याबाबत अधिक माहिती देण्यात आली असून त्यांनी असे म्हटले आहे की, खात्यात जमा असलेल्या एक लाख रुपयांवर 0.25 टक्के कमी व्याज मिळणार आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे 40 कोटी ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. एसबीआयने बचत खात्यावरील व्याजदर तर्कसंगत करण्यासाठी वार्षिक 3 टक्के केले आहे.बँकेने सर्व बचत खातेधारकांना व्याज दर तर्कसंगत करत 3 टक्के वार्षिक केले आहे.

यापूर्वी 1 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम खात्यात असल्यास ग्राहकांना 3.25 टक्के व्याजदर ठेवला होता. तर 1 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास त्यावर 3 टक्के व्याज देण्यात येत होते. तसेच बँकेने गेल्याच आठवड्यात त्यांच्या एफडीवरील व्याजदरात सुद्धा कपात केली आहे. महिन्याभराच्या आतमध्ये पुन्हा एकदा व्याजदर घटवले आहेत. बँकेने 45 दिवसांच्या शॉर्ट टर्म एफडीसाठी व्याजात 0.50% कपात केली असून हे दर 10 मार्च पासून लागू करण्यात आले आहेत.(SBI च्या ग्राहकांना झटका! FD वरील व्याजदरात कपात) 

तर एसबीआयच्या खात्यात कमीतकमी रक्कम असणे यापूर्वी अनिवार्य होते. मात्र आता कमीतकमी रक्कम खात्यात असणे अनिवार्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच बचत खाते धारकांना कमीत कमी रक्कम खात्यात ठेवण्यासाठी स्विकारली जाणारा चार्ज द्यावा लागणार नाही आहे. तसेच बँकेने एसएमएस चार्ज सुद्धा माफ केले आहेत. दरम्यान, गेल्या काही काळापासून स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी खात्यात कमीत कमी रक्कम न ठेवल्यास चार्ज करत होती. त्यामुळे नागरिकांकडून संताप सुद्धा व्यक्त करण्यात आला. मात्र बँकेच्या या निर्णयामुळे 44 कोटी लोकांना दिलासा मिळणार आहे.