Sputnik V लसीनंतर भारतात लवकरच दाखल होणार Sputnik Lite; जाणून घ्या सिंगल डोस कोविड-19 लसीची खासियत

त्यामुळे लसीकरणचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लसींच्या अपुऱ्या पुरवठा या समस्येवर आता रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचा प्रभावी उपाय उपलब्ध झाला आहे.

Covid-19 Vaccination |(Photo Credits: PTI)

सध्या देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे लसीकरणचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लसींच्या अपुऱ्या पुरवठा या समस्येवर आता रशियाच्या (Russia) स्पुटनिक-व्ही (Sputnik V) लसीचा प्रभावी उपाय उपलब्ध झाला आहे. स्पुटनिक व्ही लसीचा पहिला डोस हैद्राबादमध्ये देण्यात आला आहे. ही लस कोविड-19 च्या नव्या स्ट्रेनवर देखील प्रभावी असल्याचा रशियाच्या तज्ञांचा दावा आहे. ही लस 91.6 टक्के इतकी प्रभावी असून दोन डोसमध्ये 3 आठवड्यांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अँटीजन एकमेकांपासून भिन्न आहेत. रशियाकडून भारताला स्पुटनिक-व्ही चा पुरवठा होत असून लसीची दुसरी खेप देखील भारतात दाखल झाली आहे. दरम्यान, भारतात रशियाच्या स्पुटनिक लाईट (Sputnik Lite) लस येण्याची आशा देखील जागृत झाली आहे.

यासंदर्भात बोलताना रशियाचे राजदूत स्पुटनिक-व्ही यांनी सांगितले, "स्पुटनकि व्ही ही रशियन-इंडियन लस आहे. भारतात याचे उत्पादन वाढून वर्षाला 850 मिलियन पर्यंत पोहचेल, अशी आम्हाला आशा आहे." त्याचबरोबर लवकरच भारतात स्पुटनिक लाईट सिंगल डोस लस सादर करण्याची योजना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (रशियाच्या Sputnik Light लसीचा सिंगल डोस Coronavirus च्या सर्व स्ट्रेन्सवर परिणामकारक- RDIF)

स्पुटनिक लाईट ही लस कोरोनाच्या सर्व स्ट्रेनवर उपयुक्त असून 79.4 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले  आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच लसीच्या निर्मात्यांनी दिली होती. दरम्यान, या लसीला रशियात वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

ANI Tweet:

वेल्थ फंड रशियन डायरेक्ट इनवेस्टमेंट फंड (आरडीआईएफ) ने आपल्या निवदेनात सांगितले की, स्पुटनिक लाईट लस दिल्यानंतर 28 दिवसांनी घेण्यात आलेल्या डेटानुसार, सिंगल डोस लस स्पुटनिक लाईट 79.4 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. दोन डोस लसींच्या तुलनेत स्पुटनिक लाईट लसीचा प्रभाव हा सुमारे 80 टक्क्यांहून अधिक आहे.

उत्तम अभ्यासाअंती ह्यूमन एडिनोवायरल प्लेटफॉर्म आधारित स्पुटनिक लाईट ही लस आहे. ही अत्यंत सुरक्षित आणि प्रभावशाली आहे. 21 फेब्रुवारीला गामलेया सेंटर आणि आरडीआयएफने जगभरात स्पुटनिक लाईट लसीच्या परिणामांच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स अनेक देशांमधील तब्बल 7 हजार नागरिकांवर करण्यात आला. यात रशिया, संयुक्त अरब अमीरात (युएई) आणि घाना यांचा समावेश आहे. दरम्यान, भारतातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ही लस अत्यंत फायदेशीर ठरेल.