Rs 75 Commemorative Coin: नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय अर्थ मंत्रालय जारी करणार 75 रुपयांचे स्मारक नाणे

नाण्याच्या काठावर 200 रेषा असतील. हे नाणे मिश्रधातूंपासून बनलेले असेल. त्याच्यात चांदी, तांबे, निकेल आणि जस्त असे धातू पावरले जातील. या धातूंचे प्रमाणही ठरलेले आहे. या नाण्यात 50 % चांदी, 40 % तांबे, 5 % निकेल आणि 5 % जस्त जस्त असेल.

New Parliament Building | (Photo Credit -Central Vista )

भारतीय संसदेची नवीन इमारत (New Parliament Building) लवकरच राष्ट्राला अर्पण केली जाईल. येत्या रविवारी म्हणजेच 28 मे रोजी इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडले. दरम्यान, याच कार्यक्रमाचे औचित्य साधत आरबीआय 75 रुपयांचे स्मारक नाणे ( Rs 75 Commemorative Coin) जारी करणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) गुरुवारी ही माहिती दिली. पंचाहत्तर रुपयांच्या नाण्यावर संसद परिसर आणि नवीन संसद भवनाची प्रतिमा असेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. संसद भवनाच्या कार्यक्रमांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी 75 रुपयांचे नाणे हे देखील एक वैशिष्ट्यच मानले जात आहे. या आधीही विविध प्रसंगी अशा काही गोष्टी घडल्या आहेत. जसे की, एखाद्या विशेष कार्यक्रम, घटना अथवा कारणामुळे भारतीय डाक विभागाने पोस्टाचे तिकीटही काढले आहे.

केंद्रिय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नाणे गोलाकार असेल आणि ते 44 मिलीमीटर इतक्या व्यासाचे असेल. नाण्याच्या काठावर 200 रेषा असतील. हे नाणे मिश्रधातूंपासून बनलेले असेल. त्याच्यात चांदी, तांबे, निकेल आणि जस्त असे धातू पावरले जातील. या धातूंचे प्रमाणही ठरलेले आहे. या नाण्यात 50 % चांदी, 40 % तांबे, 5 % निकेल आणि 5 % जस्त जस्त असेल. (हेही वाचा, New Parliament Building Inauguration Details: नवे संसद भवन, उद्घाटन कार्यक्रम संपूर्ण तपशील, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर)

नाण्यावर भारताची नवी संसद आणि संसदेचा परिसर असेल तर त्याच्या खाली आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये 2023 हे सालही कोरलेले असेल. हे नाणे ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असेल, असा विश्वासही केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

ट्विट

दरम्यान, नवे संसद भवन (New Parliament Building) येत्या 28 मे (रविवार) रोजी भारताला अर्पण केले जाईल. विद्यामान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या नेतृत्वाखाली नव्या संसद भवनाचा उद्घाटन समारंभ पार पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, या उद्घाटन समारंभाचा तपशील अद्याप तरी अधिकृतपणे जाहीर केला गेला नाही. मात्र, वृत्तसंस्था एएनआयने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये उद्घाटन समारंभाबाबत काही तपशील पुढे आला आहे. जो आम्ही इथे देत आहोत. नव्या संसद भवनामुळे पुरातन वास्तू असलेली भारताची जुनी संसद इमारत आता केवळ पर्यटनाचे निमित्त राहील.