Road Accident: तिरूपती बालाजी दर्शनानंतर घरी परतणार्‍या सोलापूरच्या भाविकांवर काळाचा घाला; गाडी दुभाजकाला धडकल्याने 4 जण मृत्यूमुखी

तिरूपती जवळ चंद्रगिरी जवळ डिव्हायडरला गाडी आदळली आणि ही दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे. ही गाडी तवेरा होती. दर्शन झाल्यानंतर सारे सोलापूरला निघताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.

Accident (PC - File Image)

आंध्रप्रदेशामध्ये (Andhra Pradesh) तिरूपती बालाजीच्या दर्शनानंतर (Tirupati Balaji Mandir Darshan)  घरी परतणार्‍या सोलापूरच्या (Solapur) भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. तिरूपती जवळ चंद्रगिरी जवळ डिव्हायडरला गाडी आदळली आणि ही दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे. ही गाडी तवेरा होती. दर्शन झाल्यानंतर सारे सोलापूरला निघताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.

कारचा वेग जास्त असल्याने गाडी अचानक डिव्हायर्डरला आदळल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी जखमींवर योग्य उपचार व्हावेत यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश दिले असल्याचं सांगितले आहे.

अर्थव टेंभुर्णीकर, मयुर मठपती, ऋषिकेश जंगम व अजय लुट्टे अशी चार मृतांची नावं आहेत. जुळे सोलापुरातील जानकी नगर येथील नऊ मित्र तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनाला गेले होते. या अपघाताप्रकरणी चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement