RIL AGM 2020: जिओ प्लॅटफॉर्म मध्ये आता Google ची देखील गुंतवणूक; 5G solution, JioGlass सह या मोठ्या घोषणा

दरम्यान कंपनीने केलेल्या दाव्यानुसआर, ₹33,737 चे म्हणजे 7,7% गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे जिओ मध्ये स्टेक हॉल्डर्सची एकूण गुंतवणूक ₹1,52,056 कोटीपर्यंत गेली आहे.

Mukesh Ambani (Photo Credits: IANS)

Reliance AGMs 2020 Highlights:    रिलायंसचे सर्वेसर्वा उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या आज रिलायंस कंपनीच्या वार्षिक सभेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज कोरोना संकटकाळात झालेल्या 43व्या Annual General Meeting मध्ये त्यांनी आगामी प्लॅन्सची माहिती दिली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा घेतली जात आहे.  यावेळेस त्यांनी   पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या आत्मनिर्भर भारत (Aatma Nirbhar Bharat)  प्रकल्पाचा पुरस्कार करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान यामध्ये आता जिओ मूळापासून भारतामध्ये 5G solution डेव्हलप केले असल्याचे  त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचे ट्रायल्स हे 5G spectrum उपलब्ध झाल्यानंतर लगेच सुरू केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. यासोबतच त्यांनी JioGlass, Jio-Google partnership, JioMart ची माहिती दिली आहे.

JioGlass

दरम्यान जिओ ग्लास देखील लॉन्च केला आहे. JioGlass हे 3 डी इंटरॅक्शन असून holographic content पाहण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. अवघी 75gms ची असून त्यामध्ये कस्टमाईज्ड ऑडिओदेखील असेल. जिओ ग्लासला 25 अ‍ॅप्स सपोर्ट करणार असून त्याचा वापर शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो. Jio Glass: रिलायंसच्या 43व्या वार्षिक सभेमध्ये लॉन्च झालेल्या या मिक्स्ड रिअ‍ॅलिटी स्मार्ट चष्माची जाणून घ्या वैशिष्ट्य.

Jio-Google partnership

जिओला आता Google कंपनीची देखील साथ मिळणार आहे. दरम्यान कंपनीने केलेल्या दाव्यानुसआर, ₹33,737 चे म्हणजे 7,7% गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे जिओ मध्ये स्टेक हॉल्डर्सची एकूण गुंतवणूक ₹1,52,056 कोटीपर्यंत गेली आहे.

Jio Mart

Jio Mart हे किराणामाल व्यावसयिक आणि ग्राहकांसाठी एक नवा अनुभव देणार आहे. देशात सुमारे 200 शहरांमध्ये बिटा स्वरूपात ते लॉन्च झाले आहे. जिओ व्हॉट्सअ‍ॅप सोबत काम    करत  आहे.  जिओ मार्ट आणि व्हॉट्सअ‍ॅप एकत्र काम करून देशातील लाखो लहान व्यावसायिकांना  ग्राहकांसोबत जोडणार आहे.

JioTV Plus

JioTV Plus च्या माध्यमातून रिलायंस आता ओटीटी प्लॅटफोर्म उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये  Netflix, Amazon Prime, Disney Hotstar, Voot, SonyLiv, Zee5, JioCinema, JioSaavn, YouTube अशा जगभरातील 12 प्रमुख ओटीटी यांंचा एकत्र अनुभव घेता येणार आहे.

दरम्यान यंदा प्रथमच रिलायंसची ही वार्षिक सभा व्हर्च्युअल माध्यमातून पार पडत आहे. इच्छुक याचं लाईव्ह स्ट्रिमिंग Reliance Jio च्या ट्वीटर अकाऊंट वर, युट्युब चॅनलवर पाहू शकणार आहेत.