RBI New Governor: मोठी बातमी! महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची आरबीआयचे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती
मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 बॅचचे आयएएस अधिकारी असून ते शक्तिकांता दास यांची जागा घेणार आहेत. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ मंगळवारी (10 डिसेंबर 2024) संपत आहे. संजय मल्होत्रा यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अंतर्गत राजस्थान केडरमधून आपली सेवा सुरू केली. ते आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
RBI New Governor: भारत सरकारने महसूल सचिव संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांची रिझर्व्ह बँकेचे पुढील गव्हर्नर (RBI New Governor) म्हणून नियुक्ती केली आहे. मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 बॅचचे आयएएस अधिकारी असून ते शक्तीकांता दास (Shaktikanta Das) यांची जागा घेणार आहेत. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ मंगळवारी (10 डिसेंबर 2024) संपत आहे. संजय मल्होत्रा यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अंतर्गत राजस्थान केडरमधून आपली सेवा सुरू केली. ते आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी सेंट्रल बँकेची जबाबदारी स्वीकारली होती. संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांचा असेल.
मल्होत्रा यांना वित्तीय सेवा क्षेत्रातील प्रचंड अनुभव आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाचे सचिव म्हणून त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारमधील कर आणि आर्थिक बाबींचाही त्यांना सखोल अनुभव आहे. संजय मल्होत्रा यांचा वित्तीय सेवा क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर आता रिझर्व्ह बँकेची जबाबदारी देण्यात आली आहे. (हेही वाचा -RBI Monetary Policy Committee Meeting Updates: रेपो रेट सलग 11 व्या वेळेस 6.5% वर कायम)
कोण आहेत संजय मल्होत्रा? (Who is Sanjay Malhotra)
संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी आणि यूएसएच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 33 वर्षांच्या कारकिर्दीत नेतृत्व आणि उत्कृष्टता दाखवून, संजय मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव आहेत. (हेही वाचा - Shaktikanta Das Health Update: आरबीआय चे गर्व्हनर चैन्नई मध्ये Acidity च्या त्रासामुळे Apollo Hospital मध्ये दाखल; लवकरच Discharge मिळणार)
संजय मल्होत्रा यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. त्यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)