IPL Auction 2025 Live

Restrictions On Sale of Platform Tickets: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' गर्दीच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर निर्बंध; वांद्रे दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी 8 नोव्हेंबरपर्यंत तत्काळ लागू असेल.

Railway Platform प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - फेसबुक)

Restrictions On Sale of Platform Tickets: मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकावर (Bandra Terminus Station) झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर या प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी (Temporarily Banned The Sale of Platform Tickets) घातली आहे. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी 8 नोव्हेंबरपर्यंत तत्काळ लागू असेल.

वांद्रे टर्मिनस स्थानकावर चेंगराचेंगरी -

मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकावर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री उशिरा 2 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोरखपूरला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा ट्रेनमध्ये चढण्याच्या घाईत चेंगराचेंगरी झाली, त्यात सुमारे 10 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा - Bandra Railway Station Stampede: मुंबई येथील वांद्रे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 8 प्रवासी गंभीर जखमीच गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढताना घटना)

दरवर्षी दिवाळी आणि छठ दरम्यान भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये गर्दी दिसून येते. सण साजरा करण्यासाठी देशातील विविध शहरांतील लोक यूपी-बिहारमध्ये जातात. दरम्यान, मोठी गर्दी झाल्याने हा अपघात झाला. वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या अपघातानंतर रेल्वेने वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस या साप्ताहिक गाडीचे वेळापत्रक अपडेट केले होते. ही गाडी पहाटे 5.10 वाजता धावणार होती. री-शेड्युल केल्यानंतर सकाळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर उशिरा आली. (हेही वाचा, Bandra Railway Station च्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम जानेवारीपर्यंत होणार पूर्ण, पश्चिम रेल्वेची माहिती)

दरम्यान, स्थानकावर प्रचंड गर्दी असल्याने सर्वसाधारण बोगीत चढण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 9 जण जखमी झाले आहेत. यात काही प्रवाशांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत, तर काहींना कंबर आणि हाता-पायाला फ्रॅक्चर झाले आहे. दोन जखमींना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित प्रवाशांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.