तुमच्याकडे ड्रोन असल्यास 31 जानेवारी पूर्वी रजिस्ट्रेशन करा, नाहीतर होईल तुरुंगवास
त्यानुसार 31 जानेवारी पूर्वी ज्या व्यक्तींकडे ड्रोन आहेत त्यांनी त्याचे रजिस्ट्रेशन करावे असे आदेश दिले आहेत. मात्र रजिस्ट्रेशन न केल्यास त्या व्यक्तीच्या विरोधात आयपीसी आणि उड्डाण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय यांनी ड्रोन असणाऱ्यांसाठी महत्वाची सुचना दिली आहे. त्यानुसार 31 जानेवारी पूर्वी ज्या व्यक्तींकडे ड्रोन आहेत त्यांनी त्याचे रजिस्ट्रेशन करावे असे आदेश दिले आहेत. मात्र रजिस्ट्रेशन न केल्यास त्या व्यक्तीच्या विरोधात आयपीसी आणि उड्डाण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. रजिस्ट्रेशन आजपासून सुरु होणार आहे. अमेरिकेने इराणवर ड्रोन हल्ला केल्यानंर नागरी उड्डाण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत एक नोटीस सुद्धा जाहीर करण्यात आली आहेय
मंत्रालयाने नोटीस जाहीर करत असे म्हटले आहे की, सरकारला अशी माहिती मिळाली आहे की काही जणांकडे ड्रोन असून त्याचा वापर करतात. मात्र ते सिविल एव्हिएशन रिक्वायअरमेंट्स(CAR) यांचा नियमाचे उल्लंघन करतता. त्यामुळेच आता ड्रोन बाबत रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असणार आहे. मात्र जर रजिस्ट्रेशन केले नाही तर त्या व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. ड्रोन बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले आहे.(दर 3 वर्षांनी आधारकार्ड अपडेट करत नसाल तर, होऊ शकते मोठे नुकसान!)
ड्रोनसाठी डीजीसीए यांनी ऑगस्ट 2018 मध्ये सीएआर लागू केला होता. त्या अंतर्गत ड्रोन युजर्सला एक युनिक आयडेंटिफिकेशन घेणे आवश्यक असते. त्याचसोबत ड्रोन वापरण्यासाठी परमिट आणि अन्य परवानगी मिळणे गरजेचे असते. परवानगीशिवाय ड्रोन वापरण्यास किंवा उडवण्यास कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे आता येत्या 31 जानेवारीला ड्रोन युजर्सला रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना दोन युनिक क्रमांक देण्यात येणार आहेत. हे दोन क्रमांक असणाऱ्यांना ड्रोन उडणवण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्याकडील ड्रोनचे रजिस्ट्रेश करायचे असल्यास https://digitalsky.dgca.gov.in/ या संकेस्थळाला भेट द्या.