Ramdas Athawale On Donald Trump: रामदास आठवले नाराज, डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करणार

त्यांनी आपला पराभव मान्य करायला हवा होता. त्यांनी आपला पराभव मान्य करुन पुढच्या राष्ट्राध्य पदाच्या निवडणुकीत जनमत आपल्या बाजून वळविण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता, असेही आठवले यांनी म्हटले.

Ramdas Athawale , Donald Trump | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांच्या रिपब्लिकन पार्टीवर (Republican Party) भलतेच नाराज आहेत. या बाबतीत आपण डोनाल्ड ट्रम्प यांना फोन (Ramdas Athawale Will Call Donald Trump) करणार असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे. अल्पमतात असताना बहुमताचा सन्मान केला नाही असे आजवर जगात कोणत्याही देशात घडले नाही ते अमेरिकेत ट्रम्प करीत आहेत. ट्रम्प यांनी रिपब्लिकनचा अवमान केला आहे. लोकशाहीचा अवमान केला आहे, अशा शब्दात रामसाद आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

भारतात ग्राम पंचायत पासून संसदे पर्यंत लोकशाही च्या न्यायानुसर बहुमताचा ; जन मताचा सन्मान केला जातो, अशी आठवणही आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्र्म्प यांना करुन दिली आहे. रामदास आठवले यांनी बोलताना सांगितले की, अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर होता. परंतू, राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर सत्तांतर करताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी जे वर्तन केले ते निंदनीय आहे. ट्रंम्प आणि त्यांच्या समर्थकांमुळे जनादेशाचा अपमान झाला आहे. या वर्तनामुळे राष्ट्राध्यक्ष पदाची प्रतिमा मलीन झाल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे.

आठवले यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जनमताचा आदर करायला हवा होता. त्यांनी आपला पराभव मान्य करायला हवा होता. त्यांनी आपला पराभव मान्य करुन पुढच्या राष्ट्राध्य पदाच्या निवडणुकीत जनमत आपल्या बाजून वळविण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता, असेही आठवले यांनी म्हटले. (हेही वाचा, Shiv Sena On Saamana: डोनाल्ड ट्रम्प यांची भलामण केली याचे दु:ख होतच असेल!; शिवसेनेचा पंतप्रधान मोदी यांना टोला)

दरम्यान, सत्तांतर होत असताना डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवरच हल्ला चढवला. या वेळी झालेल्या गदारोळात 5 लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली. या घटनेची जगभर चर्चा होत आहे.