Rajasthan: ज्येष्ठ नागरिकाकडून 85 वर्षीय महिलेची On Camera हत्या, व्हिडिओ व्हायरल

आरोपी जेव्हा महिलेला भेटला तेव्हा मद्यधुंत अवस्थेत होता. ते संभ्रमीत होता. त्याने स्वत:वरचे नियंत्रण हरवले. तो स्वत:ला देवाचा अवता म्हणत होता. त्याने सांगितले की आपण भगवान शिवाचा अवतार आहोत आणि आपण या महिलेला ठार मारून पुन्हा जिवंत करु शकतो. त्याने त्या संभ्रमाच्या भरातच महिलेवर छत्रीने वार केले आणि तिला ठार केले.

Rajasthan: ज्येष्ठ नागरिकाकडून 85 वर्षीय महिलेची On Camera हत्या, व्हिडिओ व्हायरल
On Camera Killing | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

On Camera Killing Video: राजस्थान राज्यातील उदयपुर (Udaipur) येथून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका 60 वर्षीय पुरुषाने 85 वर्षीय महिलेची छत्रीने भोसकून हत्या केली आहे. व्हिडिओमध्ये सदर इसम महिलेवर छत्रीने हल्ला करताना दिसत आहे. ज्यात या महिलेचा मृत्यू झाला. कल्कीबाई गमेती असे या महिलेचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला. प्रत्यक्षदर्शिंपैकी दोघे अल्पवयीन आहेत. यापैकी कोणीही महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी जेव्हा महिलेला भेटला तेव्हा मद्यधुंत अवस्थेत होता. ते संभ्रमीत होता. त्याने स्वत:वरचे नियंत्रण हरवले. तो स्वत:ला देवाचा अवता म्हणत होता. त्याने सांगितले की आपण भगवान शिवाचा अवतार आहोत आणि आपण या महिलेला ठार मारून पुन्हा जिवंत करु शकतो. त्याने त्या संभ्रमाच्या भरातच महिलेवर छत्रीने वार केले आणि तिला ठार केले. पोलिसांनी सांगितले की, एका प्रत्यक्षदर्शीने महिलेला वाचविण्याचा आणि आरोपीला आवरण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, आरोपी महिलेच्या बाजूलाच उभा आहे. तो तिला सांगित आहे आहे की, तो भगवान शिवाचा अनुयायी आहे. भगवान शिवानेच त्याला तिच्याकडे पाठवले आहे. तो म्हणतो आहे की, "महाराणी है तू (तू एक राणी आहेस) आणि अचानक तिच्या छातीवर खूप जोराने वार करतो. ती महिला जमिनीवर पडली आणि आरोपीने तिला केसांना धरुन फरफटले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिला जमिनीवर पडली असून आरोपी तिच्या डोक्यावर छत्रीने वार करताना दिसत आहे.

व्हिडिओ

सदर घटना राजस्थानमधील उदयपूर येथील गोगुंडा तालुका हद्दीत दुर्गम, डोंगराळ असलेल्या आदिवासीबहुल भागात घडली. वृद्ध महिला नातेवाईकाच्या घरी निघाली होती. या वेळी आरोपीने तिच्यावर सपासप वार केले.

(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2023 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).